Bhuvaneshwar kumar: भुवनेश्वर कुमार झाला बाबा, घरी नव्या पाहुण्याचे आगमन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 24, 2021 | 19:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bhuvaneshwar kumar: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार २४ नोव्हेंबरला मुलीचा बाप बनला आहे. त्याची पत्नी नुपूरने दिल्लीच्या खाजगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. 

bhuvi
भुवनेश्वर कुमार झाला बाबा, घरी नव्या पाहुण्याचे आगमन 
थोडं पण कामाचं
  • २३ नोव्हेंबर २०१७ मध्ये झाले होते भुवनेश्वर कुमार आणि नुपूरचे लग्न
  • लहानपणीचे मित्र आहेत भुवनेश्वर आणि नुपूर
  • बुधवारी दिल्लीत नुपूरने गोंडस मुलीला जन्म दिला

मेरठ: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या(bhuvaneshwar kumar) घरी आनंदाची बातमी आली आहे. भुवनेश्वर बाबा बनला आहे. भुवनेश्वरची पत्नी नुपूरने बुधवारी दिल्लीच्या खाजगी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म(blessed baby girl) दिला आहे. मेरठ जिल्हा असोसिएशनचे कोषाध्यक्ष राकेश गोयलने ही माहिती देताना सांगितले की बुधवारी भुवनेश्वर कुमारच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. दरम्यान, दोन्ही आई आणि बाळाची प्रकृती चांगली आहे. गोयल यांच्या माहितीनुसार मंगळवारी नुपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. क्रिकेटरच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पुढील दिवशी त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. bhuvaneshwar kumar wife nupur blessed baby girl

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi)

भुवनेश्वरने नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भाग घेतला होता. त्याने मालिकेतील तीनही सामने खेळले आणि तीन विकेट मिळवल्या. भुवनेश्वर आणि नुपूर हे लहानपणीचे मित्र होते आणि दोघांनी २३ नोव्हेंबर २०१७मध्ये एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. भुवनेश्वर कुमारचे वडील किरण पाल सिंह यांचे या वर्षी २० मेला निधन झाले. त्याचे वडील दीर्घकाळापासून लिव्हरसंबंधित आजारांनी त्रस्त होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी