गेम फिनिशर Hardik pandyaवर मोठं-मोठे Brand फिदा; जाहिरातीसाठी दिवसाला चार्ज करणार इतके कोटी

हार्दिक पांड्याची (Hardik pandya) वाढती क्रेझ पाहता अनेक कंपन्या (companies) इन-कॅश करू पाहत आहेत. याचमुळे मोठं-मोठ्या कंपन्या हार्दिकला जाहिराती घेण्यासाठी उत्सुक आहेत. नुसते उत्सुकच नाहीत तर त्याला दमदार मानधनही देण्यास तयार आहेत. याबाबतचे वृत्त इनसाइड स्पोर्ट्ने दिले असून पांड्याची ब्रँड मॅनेजर असलेली कंपनी राइज स्पोर्ट्सनेही पांड्याच्या आर्थिक प्रगतीबद्दल माहिती दिली आहे.

Big Brand Fida on Game Finisher Hardik Pandya
कमाईत Six मारण्यासाठी Hardikकडे मोठं-मोठ्या ब्रँडची रांग   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हार्दिक पांड्याची वाढती क्रेझ पाहता अनेक कंपन्या इन-कॅश करू पाहत आहेत.
  • राइज स्पोर्ट्सनुसार, 6 ते 7 मोठे ब्रँड हार्दिकला करारबद्ध करण्यासाठी रांगेत उभे आहेत.
  • एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी हार्दिक दिवसाला जवळपास 2 कोटी रुपये चार्ज करतो.

मुंबई: एमएस धोनीनंतर (MS Dhoni) सुपर गेम फिनिशर (Game finisher) म्हणून ओळख मिळवलेल्या हार्दिक पांड्याने (Hardik pandya) आपल्या खेळी सर्वांना त्याच्या प्रेमात पाडलं आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) पासून हार्दिक पांड्या सुपर फॉर्ममध्ये आहे. पदार्पणातच त्याने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) सारख्या नवख्या संघाला आयपीएलच विजेतेपद मिळवून दिलं.  (Big Brand Fida on Game Finisher Hardik Pandya; So many crores will be charged for advertisement)

आयपीएलमधील कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीमुळे त्याच्याकडे भविष्यातील टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पाहिलं जातं आहे. सध्याही उप-कर्णधारपदासाठी त्याचे नाव चर्चेत आहे. आयपीएल नंतर टीम इंडियाकडून खेळतानाही हार्दिकचा परफॉर्मन्स कायम आहे. क्रिकेटच्या मैदानात जोरदार फलंदाजी करणारा हार्दिक सध्या व्यावसायिक पीचवरही तशीच बॅटिग करत आहे. 

हार्दिक पांड्याची वाढती क्रेझ पाहता अनेक कंपन्या इन-कॅश करू पाहत आहेत. याचमुळे मोठं-मोठ्या कंपन्या हार्दिकला जाहिराती घेण्यासाठी उत्सुक आहेत. नुसते उत्सुकच नाहीत तर त्याला दमदार मानधनही देण्यास तयार आहेत. याबाबतचे वृत्त इनसाइड स्पोर्ट्ने दिले असून पांड्याची ब्रँड मॅनेजर असलेली कंपनी राइज स्पोर्ट्सनेही पांड्याच्या आर्थिक प्रगतीबद्दल माहिती दिली आहे.

Read Also : BCCI कोहलीची मानसिकता करतेय कणखर, अॅप्टनकडे दिलीय जबाबदारी

ब्रँड व्हॅल्यु 30 ते 40 टक्क्यांनी वाढली

राइज स्पोर्ट्सनुसार, 6 ते 7 मोठे ब्रँड हार्दिकला करारबद्ध करण्यासाठी रांगेत उभे आहेत. पांड्याने त्याच्या जाहिरातीच्या फीमध्ये सुद्धा मोठी घसघशीत वाढ केली आहे. आता एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी हार्दिक दिवसाला जवळपास 2 कोटी रुपये चार्ज करतो. मैदानावरच्या सुपर परफॉर्मन्समुळे हार्दिकची ब्रँड व्हॅल्यु 30 ते 40 टक्क्यांनी वाढली आहे. हार्दिक ब्रँडबरोबर करार करताना, त्यांच्याकडून दोन दिवसांची कमिटमेंट घेतो. म्हणजे प्रति ब्रँड कमीत-कमी त्याला दोन दिवसात 4 कोटी रुपये मिळतात. 

Read Also : वादग्रस्त ट्विटप्रकरणी कमाल आर. खानला मुंबई पोलिसांकडून अटक

एका पोस्टचे घेतो इतके लाख

हार्दिक सध्या 8 ते 10 ब्रँडची जाहिरात करतोय. लवकरच त्यामध्ये आणखी 5 ते 6 ब्रँड वाढणार आहेत. सोशल मीडियावर हार्दिक कोणतेही प्रमोशन करतो, त्यावेळी प्रतिपोस्ट 40 लाख रुपये घेतो. विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोईंग असलेला हार्दिक पंड्या तिसरा क्रिकेटपटू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी