मुंबई: जागतिक क्रिकेटमध्ये(international cricket) उलटे वारे वाहू लागलेत की काय असे वाटतेय. गेल्या एका वर्षात विविध फॉरमॅटमध्ये अनेक असे सामने झालेत ज्या आश्चर्यकारक निकाल(result) पाहायला मिळालेत. याची सुरूवात २०२१च्या जानेवारीमध्ये झाली तीही भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध(india vs australia) विजयाने. त्यानंतर आता जानेवारी २०२२मध्ये वेस्ट इंडिजला(west indies) चक्क आयर्लंडकडून पराभवाचे पाणी प्यावे लागले. यातच पाकिस्तान आणि बांगलादेशनेही मोठे कारनामे केलेत.
२०२०-२१मध्ये टीम इंडिया बॉर्डर गावस्कर मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. कर्णधार कोहलीने आधीच स्पष्ट केले होते की तो अॅडलेडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या कसोटीनंतर उपस्थित राहणार नाही. अॅडलेड कसोटीत भारताला ८ विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला. या कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहली अँड कंपनी ३६ धावांवर ऑलआऊट झाली होती. विराटने मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व होते आणि यानंतर जे झाले ते भारताच्या क्रिकेट इतिहासाक सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. MCG मध्ये खेळवली गेलेली दुसरी कसोटी भारताने ८ विकेटनी जिंकली.
सिडनीमध्ये खेळवण्यात आलेला तिसरा सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात भारतासोर ४०७ धावांचे आव्हान होते कांगारू संघाचा विजय पक्का मानला जात होता. मात्र संघाने ५ बाद ३३४ धावा करत सामना अनिर्णीत राखला. त्यानंतर शेवटचा सामना ब्रिस्बेन, गाबामध्ये होणार होता. मात्र मालिकेच्या निर्णायक सामन्याआधी दुखापतींनी टीम इंडियाला त्रस्त केले. गाबा कसोटीआधी ९ खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. यात मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि मयंक अग्रवाल यांच्या नावाचा समावेश होता. ब्रिस्बेनमध्ये टीम इंडिया अश्विन आणि बुमराहशिवाय खेळत होती. अनेक खेळाडूंची पदार्पणाची मॅच होती तर काहींकडे केवळ एका सामन्याचा अनुभव होता. असे असतानाही टीम इंडिया अडखळली नाही. त्यांनी नेटाने झुंज दिली आणि शेवटच्या सामन्यात विजय मिळवला.
गेल्या एका वर्षातील क्रिकेटमधील सर्वात धक्कादायक निर्ण म्हणजे टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानकडून पराभव. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमध्ये भारताला विजयासाठी फेव्हरिट मानले जाते होते. १९९२ पासून आतापर्यंतच्या इतिहासात एकदाही भारत पाकिस्तानकडून हरलेला नाही. मात्र घडले काही उलटेच. इतक्या वर्षांनी पहिल्यांदा पाकिस्तानला भारताविरुद्ध विजयाची चव चाखता आली. या लाजिरवाण्या पराभवानंतर न्यूझीलंडनेही भारताला हरवले आणि भारताचा वर्ल्डकपमधील प्रवास संपुष्टात आला.
अधिक वाचा - विद्यार्थ्यांसाठी आज बिहार बंद, कडेकोट पोलीस बंदोबस्त
वर्षाच्या सुरूवातीला न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. मालिकेच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने हैराण होत न्यूझीलंडच्या संघाला ८ विकेटनी हरवले. बांगलादेशचा कसोटी इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. सोबतच ७ जानेवारी २०११नंतर बांगलादेश असा आशियाई संघ बनला ज्यांनी न्यूझीलंडला त्यांच्यात देशात हरवले.
या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशला दुसऱ्या कसोटीतही विजयासाठी फेव्हरिट मानला जात होता. मात्र किवी संघाने जोरदार पुनरागमन केले आणि समना एक डाव आणि ११७ धावांनी जिंकला. मालिकेत १-१ अशी बरोबरीही साधली.
जानेवारीमध्ये वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. आयर्लंडने दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजला २-१ असे हरवले. पहिला सामना यजमान वेस्ट इंडिज संघाने २४ धावांनी जिंकला होता. मात्र यानंतर आयर्लंडने दमदार पुनरागमन करताना दुसरा सामना ५ विकेटनी जिंकला. आणि शेवटचा सामनाही २ विकेटने जिंकत मालिका आपल्या नावे केली.
अधिक वाचा - पिता-पुत्राची अनोखी जोडी; एकाच संघात खेळतात एकाच पोझिशनवर
टी-२० वर्ल्डकपमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. संघाने कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आणि आफ्रिकेत इतिहास रचला जाणार की काय असे वाटू लागले. मात्र त्यानंतर काही वेगळेच घडले. आफ्रिकेने जोहान्सबर्गमध्ये कसोटी जिंकत पुनरागमन केले आणि त्यानंतर शेवटची केपटाऊन कसोटी जिंकत मालिकेवर कब्जा केला. कसोटी मालिकेनंतर कोहलीने कर्णधारपद सोडले. मात्र वनडे मालिकेत टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव झाला. भारताला तब्बल ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला.