Virat Kohli:टी20 वर्ल्डकपदरम्यान विराट कोहलीसाठी मोठी खुशखबर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 07, 2022 | 14:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup: टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) दरम्यान विराट कोहलीला मोठी खुशखबर मिळाली आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये एक खास यश मिळवले आहे. 

virat kohli
Virat Kohli:टी20 वर्ल्डकपदरम्यान विराट कोहलीसाठी मोठी खुशखबर 
थोडं पण कामाचं
  • विराट कोहलीला पहिल्यांदा आयसीसी प्लेयर ऑफ दी मंथसाठी नॉमिनेट करण्यात आले होते
  • तो पहिल्यांदा हा खिताब जिंकण्यात यशस्वी ठरलाय.
  • विराट कोहलीने ऑक्टोबरच्या कॅलेंडर महिन्यात  205 टी20 धावा केल्या होत्या.

मुंबई: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला(Virat Kohli) टी20 वर्ल्ड कप दरम्यान मोठी खुशखबर मिळाली आहे. विराट कोहली पहिल्यांदा आयसीसी प्लेयर ऑफ दी मंथ(icc player of the month) निवडला गेला आहे. विराट कोहलीने द. आफ्रिकेचा फलंदाज डेविड मिलर आणि झिम्बाब्वेचा ऑलराऊंडर सिकंदर रजाला मागे टाकत हा अवॉर्ड आपल्या नावे केला. Big good news for virat kohli during t20 world cup 2022

अधिक वाचा - गुरु नानक जयंती निमित्त मराठीतून द्या शुभेच्छा

विराट कोहलीची मोठी कामगिरी

विराट कोहलीला पहिल्यांदा आयसीसी प्लेयर ऑफ दी मंथसाठी नॉमिनेट करण्यात आले होते आणि तो पहिल्यांदा हा खिताब जिंकण्यात यशस्वी ठरलाय. विराट कोहलीने ऑक्टोबरच्या कॅलेंडर महिन्यात  205 टी20 धावा केल्या होत्या. या दरम्यान, 23 ऑक्टोबरला त्याने नाबाद 82 धावांची खेळी करत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध चार विकेटनी विजय मिळवला होता. 

टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये विराट प्रदर्शन

टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये विराट कोहली टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या बॅटमधून निघाल्या आहेत. विराट कोहलीने 5 सामन्यात 123.00 च्या सरासरीने 246 धावा करत या लिस्टमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. 

हा मोठा रेकॉर्ड केला आपल्या नावे

विराट कोहली नुकताच टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) च्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.. टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मध्ये तो 26 सामने खेळलायत यात त्याने 83.92 च्या सरासरीने 1091 केल्या आहेत. यात आणखीन वाढ होऊ शकते. दरम्यान, इतर सर्वांना मागे टाकत विराटने अव्वल स्थान पटकावले आहे. 

अधिक वाचा - कोमट पाण्यामुळे खरच वजन कमी होतं? जाणून घ्या सत्य

भारताविरुद्ध विस्फोटक खेळी करणाऱ्या लिटन दासला खास गिफ्ट

बांगलादेशविरुद्धचा सामना भारतासाठी अटीतटीचा ठरला. या सामन्यात भारताने बांगलादेशवर जरी विजय मिळवला असला तरी बांगलादेशने चांगलेच झुंजवले. दरम्यान, भारताविरुद्ध जबरदस्त खेळी करणाऱ्या लिटन दासने सामन्यानंतर खास गिफ्ट दिले. विराट कोहलीने आपली बॅट लिटन दासला गिफ्ट केली.  लिटन दासने 27 बॉलमध्ये  60 धावा ठोकल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी