Ben Stokes: बेन स्टोक्सच्या शेवटच्या सामन्यात झाला हा मोठा रेकॉर्ड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 20, 2022 | 16:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Eng vs SA: बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याला आपल्या शेवटच्या सामन्यात पराभव पाहावा लागला. मात्र या सामन्यात मोठा रेकॉर्ड बनला. 

ben stokes
बेन स्टोक्सच्या शेवटच्या सामन्यात झाला हा मोठा रेकॉर्ड 
थोडं पण कामाचं
  • आफ्रिका संघाने हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर ३३४ धावांचे आव्हान ठेवले होते.
  • या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला केवळ ४६.५ ओव्हरमध्ये २७१ धावाच करता आल्या.
  • या ामन्यात बेन स्टोक्सने ५ ओव्हर गोलंदाजी करताना ४४ धावा दिल्या तर त्याला केवळ ५ धावा करता आल्या.

मुंबई: दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड(england vs south africa) यांच्यात १९ जुलैला डरहममध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील(one day series) पहिला सामना खेळवण्यात आला. हा सामना बेन स्टोक्सच्या(ben stokes) वनडे करिअरमधील शेवटचा सामना होता. या सामन्यात भले इंग्लंडच्या संघाला विजय मिळवता आला नाही मात्र या सामन्यात एक असा रेकॉर्ड(record) केला जे पाहून सारेच हैराण झाले. हा रेकॉर्ड द. आफ्रिकेच्या संघाने बनवला आहे. (Big record in ben stokes last match in one day career)

अधिक वाचा - शिवसेनेची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद

षटकार न ठोकताही केल्या इतक्या धावा

या सामन्यात द. आफ्रिका संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला. डरहममध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्याक ५० षटकांत आफ्रिकेने ३३३ धावा केल्या. आफ्रिकेने हा इतका मोठा स्कोर षटकार न ठोकता केलाय. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे तिसऱ्यांदा घडले की जेव्हा एखाद्या संघाने ३३० पेक्षा जास्त स्कोर केलाय आणि एकही षटकार ठोकलेला नाही. षटकार न ठोकता मोठा स्कोर करण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या नावावर आहे. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध २०२०मध्ये ३४५ धावा केल्या होत्या. 

इंग्लंड संघाचा मोठा पराभव

आफ्रिका संघाने हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर ३३४ धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला केवळ ४६.५ ओव्हरमध्ये २७१ धावाच करता आल्या. या ामन्यात बेन स्टोक्सने ५ ओव्हर गोलंदाजी करताना ४४ धावा दिल्या तर त्याला केवळ ५ धावा करता आल्या. त्यामुळे हा सामना अविस्मरणीय ठरू शकला नाही. या विजयानंतर आफ्रिकेने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

अधिक वाचा - तोंडाची दुर्गंधी हा आजारांचा संकेत

बेन स्टोक्सचे वनडे करिअर

बेन स्टोक्सने सामन्याच्या एक दिवस आधीत सोमवारी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. बेन स्टोक्सने इंग्लंड संघासाठी एकूण १०५ वनडे सामने खेळलेत. यात त्याने ३८.९९च्या सरासरीने २९२४ धावा आणि ६.०५च्या इकॉनॉमीने ४ विकेट घेतल्यात. इंग्लंडला २०१९चा वर्ल्डकप जिंकून देण्यात बेन स्टोक्सची मोठी भूमिका होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी