RCBला बसला मोठा धक्का, या क्रिकेटरची सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 19, 2021 | 16:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

AB de Villiers: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डे विलियर्सने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एबी डे विलियर्सने खूप आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय केले होते. आता आरसीबीसाठी हा मोठा झटका आहे. 

ab de villiars
RCBला मोठा धक्का, या क्रिकेटरची सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती 
थोडं पण कामाचं
  • एबी डे विलियर्सने बऱ्याच आधी काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे
  • आता तो इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलसारख्या स्पर्धेतही खेळताना दिसणार नाही.
  • यामुळे RCBला मोठा झटका आहे. 

मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा(south africa former captain) माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटर एबी डे विलियर्सने(ab de villers) आता प्रत्येक प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून(cricket format) निवृत्ती(retire) जाहीर केली आहे. एबी डे विलियर्सने बऱ्याच आधी काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला(international cricket) अलविदा म्हटले आहे आणि आता तो इंडियन प्रीमियर लीग(indian premier league) म्हणजेच आयपीएलसारख्या स्पर्धेतही खेळताना दिसणार नाही. यामुळे RCBला मोठा झटका आहे. विशेष म्हणजे जेव्हा एबी डे विलियर्सने २०१८ या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. हा त्याचा अचानक घेतलेला निर्णय होता. आता जेव्हा २०२१च्या अखेरीस त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने आपल्या वयाचे कारण क्रिकेट सोडण्यासाठी सांगितले आहे. याबाबत त्याने ट्वीटही केले आहे. big setback for rcb, AB de Villiers retires from all format of cricket
 
एबी डे विलियर्सने खुद्द हे ट्वीट केले आणि म्हटले, हा एक अविश्वसनीय प्रवास आहे. मात्र मी आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृ्त्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हापासून मी मैदानावर खेळण्यास सुरूवात केली तेव्हा मी मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. उत्साहाने मी क्रिकेट खेळलो आहे. आता वयाच्या ३७व्या वर्षी तितका उत्साह नाही. यासाठी मी निवृत्तीची घोषणा करत आहे. 

त्याने आपल्या ट्वीटच्या सीरिजमध्ये लिहिले, माझे वय हे वास्तव आहे ज्याला मला स्वीकारावेच लागेल. भले हे अचानक वाटू शकते यासाठी मी आज घोषणा करत आहे. माझ्याकडे माझा वेळ आहे. क्रिकेट माझ्यासाठी असधारणपणे दयाळू राहिले आहे. टायटन्स असो वा प्रोटियाज अथवा आरसीबी जगभरासाठी खेळणे हा माझ्यासाठी मोठा आणि अकल्पनीय अनुभव राहिला आहे. यासाठी मी नेहमीच आभारी असेन. 

डे विलियर्स पुढे म्हणाला, मी संघातील प्रत्येक सहकारी, प्रत्येक प्रतिस्पर्धी, प्रत्येक प्रशिक्षक, फिजिओ आणि स्टाफ सदस्यांचे आभार मानतो. ज्यांनी एकाच रस्त्यावर प्रवास केला आहे. आफ्रिकेत अथवा भारतात जिथे जिथे मी खेळलो आहे तेथे मला मिळालेल्या प्रेमाचा आभारी आहे. माझे आई-वडील, माझे भाऊ, पत्नी डेनिएल आणि माझ्या मुलांच्या बलिदानाशिवाय हे शक्य नव्हते. मी माझ्या आयुष्यातील पुढील अध्यायाची वाट पाहत आहे. तेव्हा मी नक्कीच त्यांना पहिले स्थान देईन. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी