बर्मिंगहॅम : भारताच्या (India) बिंदयाराणी देवीने (Bindayarani Devi) वेटलिफ्टिंगमध्ये (weight lifting) महिलांच्या (women) 55 किलो वजनी गटात रौप्य पदक (Silver Medal) जिंकले. मणिपूरच्या (Manipur) बिंदयाराणी देवी राणीने स्नॅच राऊंडमध्ये (Snatch round) 86 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो असे एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. बिंदयाराणीने स्नॅच फेरीत पहिल्याच प्रयत्नात 81 किलो वजन उचलले. त्यानंतर स्नॅच फेरी पूर्ण करण्याच्या पुढील दोन प्रयत्नांमध्ये तिने 84 आणि 86 किलो वजन उचलले आणि नायजेरिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना मागे टाकून तिसरे स्थान पटकावले.
क्लीन अँड जर्क ही तिची भक्कम बाजू होती आणि ती तिने दाखवूनही दिली. बिंदयाराणीने क्लीन अँड जर्क फेरीची सुरुवात 110 किलो वजनाने केली आणि ते उचलण्यात तिला यश आले. दुसऱ्यावेळी 114 किलो वजन उचलण्याचा तिचा प्रयत्न अयशस्वी झाला, मात्र तिसऱ्या प्रयत्नात तिने 116 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले.
Read Also : Patra Chaal case : खासदार संजय राऊतांच्या घरी आली EDची टीम
नायजेरियाच्या अदिजात ओलारिनोयने या स्पर्धेत एकूण 203 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. त्याने स्नॅचमध्ये 92 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 111 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेचा हा नवा विक्रम आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची फ्रीर मोरो होती. तिने एकूण 198 किलो वजन उचलले. स्नॅच फेरीत ती 89 किलो वजन उचलून दुसऱ्या स्थानावर होती. पण क्लीन अँड जर्कमध्ये तिला फक्त 109 किलो वजन उचलता आले. तर बिंदयाराणी देवीने क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो वजन उचलून नवीन विक्रम रचला आणि दुसरे स्थान मिळवून रौप्य पदक जिंकले.
Read Also : मुंबई लोकल संबंधित मोठी बातमी, आज अनेक मार्गांवर मेगाब्लॉक
भारताच्या संकेत महादेव सरगरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 21 वर्षीय सरगर सुवर्णपदकाच्या मार्गावर होता, परंतु क्लीन आणि जर्कमध्ये दोन अयशस्वी प्रयत्नांमुळे तो एक किलोच्या स्पर्धेतून चुकला. संकेतने ने 248 किलो (113 आणि 135 किलो) वजन उचलून रौप्य पदक जिंकले.