I AM SORRY: उर्वशी रौतेलाने रिषभ पंतची मागितली माफी, पाहा व्हायरल Video

Urvashi Rautela, Rishabh Pant, viral video: उर्वशी रौतेलाचा नुकताच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये अभिनेत्रीने भारतीय विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतची माफी मागितली आहे.

bollywood actrees urvashi rautela apologizes to cricketer rishabh pant watch viral video
उर्वशी रौतेलाने रिषभ पंतची मागितली माफी, पाहा व्हायरल Video (Twitter/Instant Bollywood) | सौजन्य: Instagram 
थोडं पण कामाचं
  • उर्वशी रौतेलाने रिषभ पंतची मागितली माफी
  • उर्वशीच्या एका मुलाखतीदरम्यान झाला होता वाद
  • व्हायरल Video मध्ये उर्वशी माफी मागताना दिसली

Urvashi Rautela and Rishabh Pant: मुंबई: टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅट्समन रिषभ पंत (Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्यातील नात्याबाबत बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरु आहे. पण हा विषय नेहमीच चर्चा म्हणूनच सुरु असतो. यानंतर, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान उर्वशी रौतेलाने 'RP' शब्दाशी निगडीत बरंच काही भाष्य केलं होतं. जे रिषभ पंतसाठीच होतं असं म्हटलं जात आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. आता नुकताच एक Video व्हायरल झाला आहे ज्यामध्ये उर्वशी रौतेला रिषभ पंतची माफी मागताना दिसत आहे. (bollywood actrees urvashi rautela apologizes to cricketer rishabh pant watch viral video)

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, चर्चेचा विषय बनलेल्या एका मुलाखतीत उर्वशी असे म्हणताना दिसली होती की, आरपी म्हणजेच (रिषभ पंत) हॉटेलच्या लॉबीमध्ये तिची वाट पाहत असे. यानंतर तिने सांगितले की, जेव्हा ती तिथे पोहोचू शकली नाही, त्यानंतर रिषभ पंतचे 17 मिस्ड कॉल तिच्या फोनवर येऊन गेले होते. उर्वशीने सांगितले की,  ती शूटिंगमध्ये व्यस्त होती आणि थेट रात्री हॉटेलमध्ये पोहोचली. म्हणून तिने त्याला मुंबईत भेटण्यास सांगितले होते.

अधिक वाचा: रवींद्र जडेजाला मस्ती भोवली, टी २० वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता मावळली

याशिवाय उर्वशी पुढे असंही म्हणाली होती की, जेव्हा एका कार्यक्रमादरम्यान लोक रिषभ पंतचे नाव घेऊन तिला चिअर करत होते तेव्हा तिला खूप वाईट वाटत होते. कारण तिचीही स्वतःची देखील एक ओळख आहे. 

या सर्व गोष्टींनंतर उर्वशी रौतेलाच्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. आता  Instant Bollywood चा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये उर्वशी रिषभ पंतची माफी मागताना आणि I AM SORRY म्हणताना दिसत आहे. पाहा तो  Video:

अलीकडे उर्वशी रौतेलाही मैदानावर टीम इंडियाला प्रोत्साहन देताना बऱ्याचदा दिसते आहे. रिषभ पंतबद्दल बोलायचे झाले तर, आशिया कप त्याच्यासाठी खूप वाईट होता. असे असूनही, त्याला 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. 

अधिक वाचा: ५३व्या वाढदिवसानिमित्त शेन वॉर्नच्या अधिकृत हँडलवरून आलेल्या ट्वीटने इंटरनेटवर खळबळ

यामुळे मागील परफॉर्मन्स विसरुन टी-20 विश्वचषकात रिषभ पंतला जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे. कारण याच कामगिरीच्या जोरावर रिषभला संघातील आपलं स्थान पक्कं करता येणार आहे. कारण अनेकदा मोक्याच्या क्षणी रिषभ आपली विकेट फेकतो असं त्याच्याबाबत म्हटलं जातं. आपल्यावरील हा शिक्का पुसून काढण्यासाठी आता रिषभला काही संयमी पण निर्णायक खेळी खेळाव्या लागणार आहेत. ज्याचा टीम इंडियाला देखील नक्कीच फायदा होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी