IND vs SA: टीम इंडियासाठी आणखी एक वाईट बातमी, हा गोलंदाजही दुखापतग्रस्त

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 04, 2022 | 13:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa 2nd Test:भारत आणि द. आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या जोहान्सबर्ग कसोटीच्या अखेरच्या सत्रात टीम इंडियासाठी वाईट बातमी आली. 

team india
IND vs SA: टीम इंडियासाठी आणखी एक वाईट बातमी 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि द. आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या जोहान्सबर्ग कसोटीच्या अखेरच्या सत्रात टीम इंडियासाठी वाईट बातमी आली.
  • सिराजला दुखापत झाली
  • सिराजच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची समस्या अधिकच वाढली आहे

जोहान्सबर्ग: भारत आणि द. आफ्रिका यांच्या जोहान्सबर्गमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिला दिवस भारतासाठी तितका खास नव्हता. सामन्याच्या आधी विराट कोहली दुखापतग्रस्त झाल्याने सामन्यात खेळू शकला नाही. तर दिवस संपेपर्यंत टीम इंडियाचा धाकड गोलंदाज मोहम्मद सिराजही आपल्या ओव्हरदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने मैदानाबाहेर गेला. जोहान्सबर्ग येथील कसोटीत भारताचा पहिला डाव २०२ धावांवर आटोपला. 

भारत आणि द. आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या जोहान्सबर्ग कसोटीच्या अखेरच्या सत्रात टीम इंडियासाठी वाईट बातमी आली. दिवसाचा खेळ संपण्यासाठी सात बॉल शिल्लक होते. अशातच गोलंदाजीसाठी उतरत असलेल्या मोहम्मद सिराजला दुखापत झाली. तो आपल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल फेकत असताना मोहम्मद सिराज स्टम्पजवळ येऊन थांबला आणि त्याने आपला उजवी मांडी पकली. सिराजची ही स्थिती पाहून टीमचे फिजिओ नितीन पटेल आले आणि वेगवान गोलंदाजांला मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. सामन्यात दुखापतीमुळे आधीच विराट कोहली बाहेर. त्यात आता सिराजच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची समस्या अधिकच वाढली आहे. 

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सिराजच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतेही विधान आलेले नाही. सामन्याबाबत बोलायचे झाल्यास टीम इंडियाचा पहिला डाव २०२ धावांवर आटोपला.यानंतर द. आफ्रिकेने एक बाद ३५ धावा करत आपले पारडे जड ठेवले. जेनसने ३१ धावा देत चार विकेट मिळवल्या. तर त्यांचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने (६४मध्ये तीन विकेट) आणि डुआने ओलिवियर(६४धावांमध्ये तीन विकेट) घेत चांगली साथ दिली. दिवसाचा खेळ संपण्याआधी द. आफ्रिका ऐडन मार्करामची विकेट पडली. मोहम्मद शमीने त्याला बाद बाद केले. सध्या मैदानावर कीगन पीटरसन आणि कर्णधार डीन एल्गर खेळत आहे. आफ्रिकेचा संघ सध्या भारताच्या १६७ धावांनी पिछाडीवर आहे.

लोकेश राहुलने टॉसवेळेस सांगितले की विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीला त्रास होत आहे. या कारणामुले त्याला आराम देण्यात आला आहे. आशा आहे की पुढच्या कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली फिट होईल. विराट कोहलीसाठी हा सामना स्पेशल होता. त्याचा हा ९९वा सामना होता. विराट कोहली जर या सामन्यात खेळला असता तर या मालिकेतील तिसरा सामना त्याचा १००वा सामना असता. मात्र अआता अलले होणार नाही कारण या मालिकेतील तिसरा सामना त्याचा ९९वा कसोटी सामना असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी