Team India: द. आफ्रिका मालिकेआधी टीम इंडियात होणार हा मोठा बदल, या घातक गोलंदाजाची एंट्री!

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 26, 2022 | 17:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa: द. आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेआधी टीम इंडियामध्ये एक बदल पाहायला मिळू शकतो. संघात एका घातक गोलंदाजाची एंट्री होऊ शकते. 

team india
आफ्रिका मालिकेआधी या घातक गोलंदाजाची टीम इंडियात एंट्री? 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडिया आणि द.आफ्रिकात यांच्यात २८ सप्टेंबरपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरू होत आहे.
  • नुकतीच  टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती.
  • या मालिकेआधी गोलंदाज मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२२(t-20 world cup) आधी टीम इंडिया(team india) द. आफ्रिकेविरुद्ध(south africa) ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. ही टी-२० मालिका(t-20 series) सुरू होण्यास फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत. यातच टीम इंडियाच्या खेम्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या मालिकेतसाठी टीम इंडिया स्क्वाडमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो आणि संघात एका घातक गोलंदाजाची एंट्री होऊ शकते. हा खेळाडू गेल्या काही काळापासून खराब कामगिरीमुळे संघाबाहेर आहे. Bowler umran Malik can be replace for Mohammad shami in south Africa series

अधिक वाचा - मुंडेंनी साधला तानाजी सावंतांव जोरदार निशाणा,म्हणाले........

टीम इंडियात होणार मोठा बदल

टीम इंडिया आणि द.आफ्रिकात यांच्यात २८ सप्टेंबरपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरू होत आहे. नुकतीच  टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. या मालिकेआधी गोलंदाज मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो द. आफ्रिका मालिकेतही संघाचा भाग आहे मात्र अद्याप हे स्पष्ट नाही की तो या मालिकेत खेळणार की नाही. यातच अशी बातमी येत आहे की उमरान मलिकला स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात सामील केले जाऊ शकते.

 

बीसीसीआयला लवकर घ्यावा लागेल निर्णय

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला सांगितलले, मी शमी आणि त्याच्या फिटनेसबाबतच्या सध्याच्या स्थितीबाबत काहीही माहीत नाही. मेडिकल टीमद्ये याबाबत माहिती असेल. रिपोर्टनुसार मोहम्मद शमी या मालिकेत खेळू शकणार की नाही याबाबत चित्र स्पष्ट नाही. तर उमरान मलिकला स्टँडबायमध्ये तयार राहण्यास सांगितले आहे. 

अधिक वाचा - बारामतीतील भरकार्यक्रमात गोंधळ, ताईच्याच समोर भिडले दोन गट

आयर्लंड दौऱ्यावर केले होते पदार्पण

उमरान मलिकने या वर्षी आयर्लंड दौऱ्यावर आपले पदार्पण केले होते. उमरान मलिकने २०२२मध्ये आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आपली छाप सोडू शकला नाही आणि ३ सामन्यानंतर तो संघाबाहेर गेला मलिक टीम इंडियासाठी आतापर्यंत ३ टी-२० सामने खेळला आहे. यात त्याने १२.४४च्या इकॉनॉमीने धावा केल्या आहेत. तसेच २ विकेट मिळवल्या आहेत. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला संघाबाहेर ठेवले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी