World Cup 2023: क्रिकेटसाठी 2023 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. यंदा क्रिकेटमध्ये आयसीसीच्या दोन मोठ्या स्पर्धा पार पडणार आहेत. यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर वनडे वर्ल्ड कप चॅम्पियनशिप रंगणार आहे. यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्ड कपचे आयोजन भारतात होणार आहे. मात्र स्पर्धांपूर्वीच या स्पर्धेतील विजेत्या टीमबद्दल एका दिग्गज प्लेअरने भविष्यवाणी केली आहे.
भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपला अजून 7 महिने बाकी आहेत, पण या वर्षी 2023 चा विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या नावाचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा एकेकाळचा फास्ट बॉलर ब्रेट ली याने यावेळी 2023 ची वर्ल्ड कप ट्रॉफी कोणती टीम घेऊन जाणार याबाबतची भविष्यवाणी केली आहे.
अधिक वाचा: WTC Final 2023: 'या' माजी खेळाडूने गावस्कर-शास्त्रींना सुनावलं, म्हणाला आधी स्वतःकडे बघा मग...
ब्रेट ली याने स्पोर्ट्स यारीशी बोलताना सांगितलं की, 'भारत 2023 वर्ल्ड कपसाठीचा प्रबळ दावेदार आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करणं अवघड असणार आहे. कारण भारताला भारतीय परिस्थितीबद्दल सर्वात जास्त आणि चांगली माहिती आहे, त्यामुळे मला वाटतं की भारत 2023 वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे.'
याशिवाय ब्रेट ली याने 7 जूनपासून होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्याबाबतही भविष्यवाणी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद कोणती टीम जिंकेल याविषयी ब्रेट ली म्हणाला, 'ही चॅम्पियनशीप ऑस्ट्रेलिया जिंकेल. भारत हा एक चांगली टीम आहे, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवली जाणार आहे आणि परिस्थिती ऑस्ट्रेलियाला अधिक अनुकूल असेल, त्यामुळे माझं मतं ऑस्ट्रेलियासाठी असणार आहे.'