Mohammad shami: शमीविरोधात अपप्रचार पसरवण्यामागे पाकिस्तानचा हात - रिपोर्ट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 28, 2021 | 17:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

शमीविरोधात अपप्रचार मोहीम पाकिस्तानातून सुरू करण्यात आल्याची माहिती रिपोर्टमध्ये आहे. ही खोटी माहिती पसरवण्याचे काम पाकिस्तानातून सुरू झाल्यास एका रिपोर्टमध्ये म्हटल्याचं समोर आल आहे.

mohammad shami
Shami: शमीविरोधात अपप्रचार पसरवण्यामागे पाकिस्तानचा हात 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीला चांगली कामगिरी करता आली नाही.
  • भारत-पाकिस्तान सामन्यानंतर जरी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले असले तरी अनेक दिग्गजांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता
  • एका व्हेरिफाईड नसलेल्या ट्विटर हँडलवरून हा प्रोपगेंडा काऊटर केल्याची माहिती समोरआली आहे.

मुंबई: सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये(icc t-20 world cup 2021) पाकिस्तानविरुद्धच्या(pakistan) भारताच्या पराभवानतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत(mohammad shami) अपप्रचार अभियान सुरू करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर रविवारी भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने भारताला १० विकेटनी हरवले होते. या सामन्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ऑनलाईन नामुष्की सहन करावी लागली. सामना संपताच इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर चाहत्यांनी शमीविरोधात अपमानजनक विधाने केली. 

दरम्यान, शमीविरोधात अपप्रचार मोहीम पाकिस्तानातून सुरू करण्यात आल्याची माहिती रिपोर्टमध्ये आहे. ही खोटी माहिती पसरवण्याचे काम पाकिस्तानातून सुरू झाल्यास एका रिपोर्टमध्ये म्हटल्याचं समोर आल आहे. एका व्हेरिफाईड नसलेल्या ट्विटर हँडलवरून हा प्रोपगेंडा काऊटर केल्याची माहिती समोरआली आहे. या ट्विटर हँडलचे १० हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

Shami

शमीची खराब कामगिरी

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीला चांगली कामगिरी करता आली नाही. या सामन्यात शमीने ३.५ षटके टाकली. यात त्याने ४३ धावा दिल्या. त्यानंतर त्याच्यावर टीका सुरू झाली. 

Shami

शमीला अनेकांचा पाठिंबा

भारत-पाकिस्तान सामन्यानंतर जरी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले असले तरी अनेक दिग्गजांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता. म्मीच्या बचावासाठी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, इरफान पठाण मैदानात उतरले. 

शमीचा जुना व्हिडिओ व्हायरल

मोहम्मद शमीवरून सुरू असलेल्या वादादरम्यान त्याचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ २०१७ सालचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मॅचनंतरचा आहे. या सामन्यात भारताचा पाकिस्तानच्या हातून १८० धावांनी मोठा पराभव झाला होता. या पराभवानंतर जेव्हा भारताचा संघ प्रेक्षकांमधून ड्रेसिंग रूमच्या दिशेने ात होता तेव्हा एका पाकिस्तानी चाहत्याने जोरजोरात ओरडण्यास सुरूवात केली. संपूर्ण टीम पुढे जात होती मात्र मोहम्मद शमीला हे ऐकवलं नाही. तो परत मागे परतला आणि त्या फॅनला विचारू लागला की तो काय म्हणाला. शमीला त्या फॅनला त्याच्याच शब्दात उत्तर द्यायचे होते. मात्र तेथील सुरक्षारक्षक आणि एमएस धोनीने शमीला परत बोलावले आणि त्याला घेऊन गेले

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी