मुंबई: इंग्लंड(england) आणि न्यूझीलंड(new zealand) यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत टी-२०सारखा सामना पहायला मिळाला. न्यूझीलंडच्या २९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स(ben stokes) आणि जॉनी बेअरस्ट्रॉ(johny bairstraw) यांनी असे वादळ आणले की सारेच हादरून गेले. दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी पहिले चार फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर संघाला जिंकवण्याची संपूर्ण जबाबदारी कर्णधार बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्ट्रॉवर आली. captain be stokes smashed six in test match against new zealand
अधिक वाचा - 500 मीटर बर्फाखाली सापडली जीवसृष्टी
दोन्ही फलंदाजांनी धमाकेदार खेळी करत ट्रेंट ब्रिज स्टेडियवर प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. कर्णधार बेन स्टोक्सने शानदार अर्धशतक ठोकले. तर जॉनी बेअरस्ट्रॉने जबरदस्त सेंच्युरी ठोकली. बन स्टोक्सने आपल्या या तुफानी खेळीदरम्यान अनेक गगनचुंबी षटकार ठोकले.
5️⃣0️⃣ for the skipper! — England Cricket (@englandcricket) June 14, 2022
Scorecard & Videos: https://t.co/ffFnHnaIPX
🏴 #ENGvNZ 🇳🇿 | @IGcom pic.twitter.com/tYPAIddZIb
इंग्लंडला जेव्हा ४१ धावांची गरज होती तेव्हा ५४ धावांवर खेळत असलेल्या बेन स्टोक्सने न्यूझीलंडचा गोलंदाज ब्रेसवेलच्या बॉलवर लाँग ऑफच्या दिशेने असा जोरदार सिक्स ठोकला की बॉल स्टेडियमपार गेला. आपल्या तुफानी खेळी दरम्यान बेन स्टोक्सने हार्ड हिटिंग केली. त्याने ७० बॉलमध्ये १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावा कुटल्या. जॉनी बेअरस्ट्रॉ आणि बेन स्टोक्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाने ५० ओव्हरमध्ये ५ विकेटनी सामना जिंकला.
That is HUGE! — England Cricket (@englandcricket) June 14, 2022
Scorecard & Videos: https://t.co/ffFnHnaIPX
🏴 #ENGvNZ 🇳🇿 pic.twitter.com/f8zD3yeqBs
या सामन्यांसोबत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन सामने जिंकत मालिकेत विजय मिळवला आहे. बेनने षटकार ठोरत अर्धशतक पूर्ण केले तर आपल्या संघाला ५०व्या ओव्हरमध्ये दोन चौकार ठोकत विजय मिळवून दिला.
We’ve just chased 299 in 50 overs in a Test match on day five 🤯 — England Cricket (@englandcricket) June 14, 2022
Scorecard & Videos: https://t.co/ffFnHnaIPX
🏴 #ENGvNZ 🇳🇿 pic.twitter.com/EPG1oNUWuD
२अधिक वाचा - पोरांनो आजपासून 'चलो स्कूल चले हम'
न्यूझीलंडने पहिल्या डावात ५५३ धावा केल्या. ही किवी संघाची इंग्लंडच्या जमिनीवरील सर्वात मोठी धावसंख्या होती. प्रत्युत्तरात इंग्लंडने ५३९ धावा केल्या.त्यानंतर न्यूझीलंड संघाने २८४ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने शानदार चेस करताना पाचव्या दिवसातील तिसऱ्या सत्रात विजय मिळवला. या सामन्यात जेम्स अँडरसन ६५० विकेट घेणाला गोलंदाज ठरला तर ज्यो रूटने शानदार सेंच्युरी ठोकत विराट कोहल आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याशी बरोबरी केली. तीनही फलंदाजांनी २७ शतके ठोकली आहेत.