IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध विजय हवाय? धवनला करावे लागेल हे काम

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 29, 2022 | 10:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना 30 नोव्हेंबरला खेळवला जात आहे. हा सामना जिंकण्यासाठी कर्णधार शिखर धवन प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकतो. 

shikhar dhawan
न्यूझीलंडविरुद्ध विजय हवाय? धवनला करावे लागेल हे काम 
थोडं पण कामाचं
  • संजू सॅमसनला प्लेईंग इलेव्हनमध्ये उतरण्याची संधी मिळालेली नाही आहे
  • जितक्या संधी ऋषभ पंतला देण्यात आल्या तितक्या संधी संजूला मिळालेली नाही.
  • अशातच टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर मजबूत करण्यासाठी कर्णधार शिखर धवन संजू सॅमसनला संधी देऊ शकतो.

मुंबई: भारतीय संघाला(indian team) न्यूझीलंडविरुद्धच्या(india vs new zealand) पहिल्या वनडे सामन्यात(one day match) 7 विकेटनी पराभवास सामोरे जावे लागले होते. तर दुसऱ्या वनडेत पावसाने हजेरी लावल्याने तो रद्द करण्यात आला. टीम इंडिया(team india) या मालिकेत 1-0ने पिछाडीवर आहे. अशातच भारतीय संघाला मालिका वाचवायची असेल तर तिसरा वनडे सामना काही करून जिंकवाच लागेल. यासाठी कर्णधार शिखर धवनला(captain shikhar dhawan) खराब फॉर्मात असलेल्या अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. captain shikhar dhawan have to do this work in third match against new zealand

अधिक वाचा- मुंबईतील बड्या नेत्याने सोडले ठाकरेंचे शिवबंधन

खराब फॉर्मात आहे हा खेळाडू

पहिल्या वनडे सामन्यात युझवेंद्र चहल आपल्या नावानुसार चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्याने 10 ओव्हरमध्ये 67 धावा देत एकही विकेट मिळवला नव्हता. अशातच कर्णधार शिखर धवन प्लेईंग इलेव्हनमधून युझवेंद्र चहलला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. त्याच्या जागी कुलदीप यादवनला संधी मिळू शकते. कुलदीप यादव एका संधीची वाट पाहत आहे. कुलदीपने भारतालासाठी 72 वनडे सामन्यात 118 विकेट मिळवल्या आहेत. 

या प्लेयरची होऊ शकते एंट्री

संजू सॅमसनला प्लेईंग इलेव्हनमध्ये उतरण्याची संधी मिळालेली नाही आहे. जितक्या संधी ऋषभ पंतला देण्यात आल्या तितक्या संधी संजूला मिळालेली नाही. तसेच संजू सध्या शानदार फॉर्मात आहे. अशातच टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर मजबूत करण्यासाठी कर्णधार शिखर धवन संजू सॅमसनला संधी देऊ शकतो. संजूकडे कोणत्याही गोलंदाजी आक्रमण उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे. त्याने भारतासाठी 11 वनडे सामन्यात 330 धावा केल्या आहेत. 

टीम इंडियासाठी विजय महत्त्वाचा

भारताला मालिकेत बरोबरी साधायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. भारताकडे अनेक स्टार खेळाडू आहेत जे सामना जिंकून देऊ शकतात. भारतीय संघाने आतापर्यंत शिखर धवनच्या नेतृत्वात एकही वनडे मालिका गमावलेली नाही. अशातच तिसऱ्या वनडे सामन्यात धवनचा हा रेकॉर्ड तोडला जाऊ नये. 

अधिक वाचा - द काश्मीर फाईल्स म्हणजे असभ्य चित्रपट -IFFI ज्युरी प्रमुख

पहिल्या वनडे सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून 7 विकेटनी पराभव झाला होता. भारताने पहिल्या सामन्यात तीनशेपार धावसंख्या उभारली होती. मात्र त्यानंतरही गोलंदाजांच्या साफ अपयशामुळे भारताला हे आव्हान रोखण्यात यश आले नव्हते. यामुळे भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले. दुसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय कायम राहिला त्यामुळे सामनाच रद्द करावा लागला. अशातच तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी