DJ Bravo retirement : उपांत्य फेरीच्य आशा संपुष्टात येताच चॅम्पियन DJ ब्रावो म्हणाला, हीच निरोप घेण्याची योग्य वेळ

Dwayne Bravo retirement :वेस्ट इंडीज (West Indies) संघातील अष्टपैलू (All-Round) आणि (Mumbai Indians) मुंबई इंडियन्सनंतर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) ताफ्यातून IPL मध्ये झळकलेला डीजे ब्रावोने (DJ Bravo) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) निवृत्तीची घोषणा केली आहे.

Champion DJ Bravo announces retirement second time
चॅम्पियन DJ ब्रावोची दुसऱ्यांदा निवृत्तीची घोषणा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • ब्रावोचे क्रिकेटमध्ये 18 वर्ष करिअर राहिले आहे.
  • डीजे ब्रावोने 2018 मध्येही निवृत्ती घेतली होती.
  • ब्रावोने कॅरेबियन संघासाठी 90 T20I खेळले आहेत, 78 बळी घेतले आहेत आणि 1000 हून अधिक धावा केल्या आहेत.

Dwayne Bravo retirement : नवी दिल्ली : वेस्ट इंडीज (West Indies) संघातील अष्टपैलू (All-Round) आणि (Mumbai Indians) मुंबई इंडियन्सनंतर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) ताफ्यातून IPL मध्ये झळकलेला डीजे ब्रावोने (DJ Bravo) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) निवृत्तीची घोषणा केली आहे. टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर दोन वेळच्या टी-20 वर्ल्ड चॅम्पियन (T20 World Champion) असलेल्या वेस्ट इंडीज संघाच्या सेमीफायनल (Semifinals)च्या आशा संपुष्टात आल्या. या सामन्यानंतर ड्वेन ब्रावोनं आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीला पूर्णविराम देणार असल्याचे सांगितले.

यापूर्वी 2018 मध्ये ब्रावाने निवृत्तीची घोषणा केली होती. पण 2019 मध्ये यू-टर्न घेत तो पुन्हा मैदानात उतरला. वेस्ट इंडीज संघात स्थान मिळत नसल्याच्या नाराजीवरुन ब्रावोने निवृत्तीची घोषणा केली होती. 26 ऑक्टोबर 2018 रोजी त्याने क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यानंतर तो वेगवेगळ्या देशातील व्यावसायिक लीगमध्ये खेळताना दिसला. जर वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळाले तर पुन्हा खेळू असे त्याने म्हटले होते., त्यानंतर त्याला संघात स्थानही देण्यात आले, 

निवृत्तीसंदर्भात काय म्हणाला ब्रावो....

हीच निवृत्तीची योग्य वेळ आहे. 18 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उताराचा सामना केला. ज्यावेळी मागे वळून पाहतो त्यावेळी वेस्ट इंडीज संघासाठी मोलाचे योगदान दिल्याचे समाधान वाटते. या प्रदेशाचे आणि कॅरिबियन लोकांचे इतके दिवस प्रतिनिधित्व केल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. असे ब्रावोने आयसीसीच्या कार्यक्रमात सांगितले. मैदानातील कामगिरीच्या जोरावर या कालावधीत जागतिक स्तरावर स्वत:ला सिद्ध करु शकलो, याचा अभिमान वाटतो, असेही त्याने म्हटले आहे. कर्णधार डॅरेन सॅमी जे येथे माझ्या डाव्या बाजुला उभे आहेत ते  आणि मी  तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की आमच्याकडे असलेल्या क्रिकेटपटूंच्या युगात आम्ही जागतिक स्तरावर स्वतःचे नाव कमावू शकलो. 

ब्रावो हा दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडीज संघाचा सदस्य राहिला आहे. 2012 आणि 2016 मध्ये वेस्ट इंडीजच्या संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.  ब्रावोने कॅरेबियन संघासाठी 90 T20I खेळले आहेत, 78 बळी घेतले आहेत आणि 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. चेंडू फिरवण्याचे क्षमता असलेल्या अष्टपैलू गोलंदाज  ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2004 मध्ये पदार्पण केले आणि 293 सामने खेळले. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत T20 ट्रेंड-सेटर असलेला, ब्रावो हा स्लोअर बॉलच्या फॉरमॅटमधील सर्वोत्तम खेळाडूपैकी एक आहे आणि त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.  

2012 मध्ये, ब्रावोने विजयी झेल घेत वेस्ट इंडिज संघाला पहिल्यांदा T20 विश्वचषक जिंकून दिला होता. 2016 मध्ये जेव्हा वेस्ट इंडिजने दुसरा विश्वचषक जिंकला तेव्हा ब्रोवा संघाचा सदस्य होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या भविष्य चमकदार असेल. पुढच्या पिढीला मदत करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचे वचन देखील या अनुभवी खेळाडूने दिले. 

दरम्यान, यंदाच्या वर्षीही केरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघाला स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानले जात होते. पण तुफान फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या संघाची अवस्था फुसक्या बारासारखी झाली. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर ते स्पर्धेतून बाहेर पडले. ब्रावो ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला अखेरचा टी-20 सामना खेळेल. ब्रावोने 90 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून यात त्याने 1245 धावांसह 78 विकेट पटकावल्या आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी