मुंबई: टीम इंडिया (Team India) ९ जूनपासून आपल्याच घरात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध(south africa) पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियामध्ये(team india) एक मोठा बदल झाला आहे. टीम इंडियामध्ये एका खास व्यक्तीची एंट्री झाली आहे. ही व्यक्ती दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये संघाशी जोडली गेली आहे. Changes in team india, this man enter in team
अधिक वाचा - Facebook वरुन सेक्स करायला बोलवलं आणि मग ...
लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाने सोमवारी अरूण जेटली स्टेडियममध्ये तब्बल तीन तास सराव केला. या सराव सेशनआधी आधी फिजिओ कमलेश जैन यांची संघात एंट्री झाली आहे. टीम इंडियाला नवे फिजिओ मिळाले आहेत. कमलेश जैन यांनी टीम इंडियामध्ये नितीन पटेल यांची जागा घेतली आहे. क्रिकबझच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले की, जैन कोलकाता नाईट रायडर्सचे माजी सहकाही स्टाफ सदस्य आहेत. त्यांनी नितीन पटेल यांची जागा घेतली आहे. आता त्यांना बंगळुरूमध्ये नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये ट्रान्सफर केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी हेड फिजिओ नितीन पटेल ऑगस्ट २०१९ पासून या पदावर आहेत मात्र आता त्यांनी नॅशनल क्रिकेट अकादमी बंगळुरूमध्ये खेळ विज्ञान आणि खेळचिकित्सा प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. जैन हे २०१२ पासून कोलकाता नाईट रायडर्सशी जोडले गेले आहेत. जैन २०२० पर्यंत अँड्र्यू लीपसमध्ये केकेआरमध्ये सहाय्यक फिजिओची भूमिका साकारत होते.
अधिक वाचा - एक जण देत होता वाघाला त्रास, मग काय घडलं पहा व्हिडिओ
दोन्ही संघादरम्यानची ही मालिका खूपच रोमहर्षक ठरणार आहे. टी-२० मालिकेची सुरूवात ९ जूनपासून दिल्लीत होईल आणि शेवटचा टी-२० सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाईल. ही पाच सामन्यांची मालिका विविध ५ ठिकाणी खेळवली जाणार आहे. यावेळेस टीम इंडियाचे नेतृत्व लोकेश राहुलच्या हाती आहे.