CSK ने दीड कोटीत खरेदी केलेल्या खेळाडूवर चीअर अपची जबाबदारी? IPl 2022 मध्ये संधी न मिळाल्याने उस्मानाबादच्या चाहत्यांमध्ये नाराजी

Demand to give opportunity to Rajvardhan Hungargekar ; सोशल मिडिया वरती राजवर्धन हंगरगेकर याचे फोटो व्हायरल झाले असून, तो स्टॅण्डमध्ये बसून सीएसकेच्या टीमला चीअर करताना दिसत आहे. सदर फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये मोठी नाराजी आहे. राजवर्धन हंगरगेकर याची बेस प्राईज २० लाख रुपये इतकी होती. मात्र, हंगर्गेकरला १.५० कोटी रुपयांना विकत घेतलं गेलं होत.

Demand to give opportunity to Rajvardhan Hungargekar
राजवर्धन हंगरगेकरला संधी देण्याची होतेय मागणी, चाहते संतापले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राजवर्धन हंगर्गेकरला १.५० कोटी रुपयांना विकत घेतलं
  • राजवर्धन हंगरगेकर याला एकदा संधी द्यावी असं म्हणत चाहते सीएसकेवर संतापले
  • स्टॅण्डमध्ये बसून सीएसकेच्या टीमला चीअर करताना दिसत आहे राजवर्धन हंगरगेकर

मुंबई : सीएसकेने २० लाख रुपयांची बेस प्राईज असलेल्या राजवर्धन हंगर्गेकरला १.५० कोटी रुपयांना विकत घेतलं. मात्र, हा खेळाडू चक्क स्टॅण्डमध्ये बसून मॅच बघत असल्याने सोशल मिडियावरती नाराजी व्यक्त केली जात आहे. ऑलराऊंडर असलेल्या राजवर्धन हंगर्गेकरने भारताला अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या युवा खेळाडूने स्टॅण्डमध्ये बसून मॅच बघितल्यामुळे चाहत्यांनी सीएसकेवर निशाणा साधला आहे. वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या तरुण खेळाडूला अशी वागणूक देणं चुकीचं आहे म्हणत राजवर्धन हंगरगेकर याला एकदा संधी द्यावी असं म्हणत चाहते सीएसकेवर संतापले आहेत.

अधिक वाचा : राणा दाम्पत्यांना रात्र काढावी लागणार पोलीस ठाण्यातच

स्टॅण्डमध्ये बसून सीएसकेच्या टीमला चीअर करताना दिसत आहे राजवर्धन हंगरगेकर

सोशल मिडिया वरती राजवर्धन हंगरगेकर याचे फोटो व्हायरल झाले असून, तो स्टॅण्डमध्ये बसून सीएसकेच्या टीमला चीअर करताना दिसत आहे. सदर फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये मोठी नाराजी आहे. राजवर्धन हंगरगेकर याची बेस प्राईज २० लाख रुपये इतकी होती. मात्र, हंगर्गेकरला १.५० कोटी रुपयांना विकत घेतलं गेलं होत. ऑलराऊंडर असलेल्या राजवर्धन हंगर्गेकरला अद्याप एक देखील संधी सीएसकेने दिली नसून, त्याला एकदा संधी द्यावी अशी मागणी चाहते करू लागले आहेत.

अधिक वाचा ; असे 5 अॅप्स जे तुमच्या दिनचर्येचे करू शकतात व्यवस्थापन 

नेमकं कोण आहे राजवर्धन हंगरेकर?

राजवर्धन हंगरगेकर या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालूक्यातील आहे. अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळाली. विश्वचषकात चमकदार कामगिरी केल्यानंतर राजवर्धनला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून संधी मिळाली. परंतु त्याला आतापर्यंत खेळू दिले गेले नाही. शिक्षण आणि क्रिकेटसाठी तो पुण्यात गेला. राजवर्धन माजी आमदार साहेबराव हंगरगेकर यांचा नातू आहे.

अधिक वाचा : राणांच्या जीवाचे बरे वाईट झाले तर उद्धव सरकार जबाबदार - राणे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी