CSKने गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राला १ कोटी देऊन केले सन्मानित

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 01, 2021 | 16:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Neeraj chopra: नीरज चोप्राने मिळवलेल्या यशाबद्दल चेन्नई सुपर किंग्सने सन्मानित केले आहे. देशासाठी गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा देशाचा सुपरस्टार आहे. 

csk
CSKचे नीरज चोप्राला १ कोटींचे बक्षीस  
थोडं पण कामाचं
  • चेन्नई सुपर किंग्सकडून नीरज चोप्राला एक कोटी रूपयांचा चेक देण्यात आला
  • नीरज चोप्राला सन्मानार्थ ८७५८ नंबरची जर्सीही सोपवण्यात आली.
  • टोकियोमध्ये त्याने ८७.५८ मीटर भाला लांब फेकत सुवर्णपदक मिळवले होते.

मुंबई: नीरज चोप्राने(neeraj chopra) मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल चेन्नई सुपर किंग्सने(chennai super kings) त्याचा सन्मान केले आहे. देशासाठी गोल्ड मेडल(gold medal) जिंकणारा नीरज चोप्रा देशाचा सुपरस्टार आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून नीरज चोप्राला एक कोटी रूपयांचा चेक देण्यात आला. सोबतच गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राला सन्मानार्थ ८७५८ नंबरची जर्सीही सोपवण्यात आली. टोकियोमध्ये त्याने ८७.५८ मीटर भाला लांब फेकत सुवर्णपदक मिळवले. सोशल मीडियावर नीरज चोप्रा ट्रेंड करत आहे. लोक सीएसकेचीही कौतुक करत आहे. chennai super kings gives 1 crore cheque to gold medalist neeraj chopra


चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ केएस विश्वनाथन म्हणाले, जबरदस्त कामगिरीसाठी संपूर्ण देशाला नीरज चोप्रावर गर्व आहे. ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने भारताच्या क्रीडा इतिहासात जबरदस्त कामगिरी केली आहे. 

सीएसकेच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. एका युझरने लिहिले, देशाचे दोन महान खेळाडू. एक माही आणि एक नीरज, दोघांचाही अभिमान आहे. तर एकाने लिहिले की खूपच भावूक करणारा क्षण. 

देशाला अॅथेलिटक्समधील पहिले सुवर्णपदक मिळवून देऊन नीरज चोप्राने इतिहास घडवला. २३ वर्षीय नीरज चोप्राने ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अॅथलेटिक्समधील पहिले तर एकेरी खेळातील हे देशाचे दुसरे सुवर्णपदक आहे. या ऐतिहासिक कामिगिरीनंतर अनेक ब्रॅंड आणि राजकारण्यांनी नीरजवर बक्षिसांचा पाऊस पाडला.

नीरजची पहिली थ्रो त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली असती कारण इतर भालाफेक करणाऱ्यांपैकी कोणीही 87 मीटरचा टप्पा पार करू शकला नाही. पण इव्हेंट लाईव्ह पाहणाऱ्या लाखो लोकांना माहित नव्हते की त्याला घाईघाईने पहिला थ्रो घ्यावा लागला.टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना नीरजने खुलासा केला आहे की अर्शद नदीम माझा भाला घेऊन जात होता, त्याला मी थांबवले आणि सांगितले हा माझा भाला आहे. त्याच्याकडून भाला घेतल्यानंतर मला घाईघाईने त्याचा फेक घ्यावा लागला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी