IPL 2022: धोनीला इतकी वर्षे रिटेन करणार चेन्नई, हे २ खेळाडूही कायम 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 25, 2021 | 13:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022: चेन्नई सुपरकिंग्सन एमएस धोनीला तीन वर्षांसाठी रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी दोन खेळाडू संघात कायम राहणार आहेत. 

ms dhoni
धोनीला इतकी वर्षे रिटेन करणार चेन्नई, हे २ खेळाडूही कायम  
थोडं पण कामाचं
  • रिपोर्ट्सनुसार धोनी पुढील तीन वर्षांसाठी चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळत राहाणार आहे
  • धोनीशिवाय ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि ओपनर ऋतुराज गायकवाडलाही चेन्नईने रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे
  • चेन्नई सुपरकिंग्सचा यशस्वी फलंदाज सुरेश रैनाला रिटेन केले जाणार नाही. 

मुंबई: चेन्नई सुपरकिंग्सने(chennai superkings) IPL 2022 च्या मेगालिलावाआधी(mega auction) मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपरकिंग्सनेएमएस धोनी (MS Dhoni) ला रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार धोनी पुढील तीन वर्षांसाठी चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळत राहाणार आहे. धोनीशिवाय ऑलराऊंडर रवींद्र जडेजा(ravindra jadeja) आणि ओपनर ऋतुराज गायकवाडलाही(ruturaj gaikwad) चेन्नईने रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे तर चेन्नई सुपरकिंग्सचा यशस्वी फलंदाज सुरेश रैनाला रिटेन केले जाणार नाही. chennai superkings retain ms dhoni for 3 years

चेन्नई सुपरकिंग्सला रिटेन होणारा चौथा खेळाडू कोण असेल यावर अद्याप निर्णय झालेला नाही. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार चेन्नई सुपरकिंग्सला मोईन अलीला रिटेन करायचे आहे मात्र त्यावर त्याची सहमती आहे की नाही हे अद्याप ठरलेले नाही. जर मोईन अली तयार झाला नाही तर चेन्नई सुपरकिंग्स सॅम करनला रिटेन करू शकते. फ्रेंचायझींना ३० नोव्हेंबरपर्यंत आपल्या रिटेन खेळाडूंची लिस्ट द्यायची आहे. सर्व फ्रेंचायझी चार खेळाडूंना रिटेन करू शकतात. यात ती भारतीय आणि एका परदेशी खेळाडूचा समावेश आहे. 

पुढील तीन वर्षांसाठी आयपीएलमध्ये खेळणार धोनी

धोनीला रिटेन करणे ही काही आश्चर्यजनक गोष्ट नाही कारण या खेळाडूच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सची ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त आहे. स्वत: संघ मालक एन श्रीनिवासन यांनी ही गोष्ट मान्य केली आहे. धोनीने चेन्नई सुपरकिंग्सच्या एका कार्यक्रमातही हे म्हटले होते आणि इशारा केला होता की तो आयपीएल खेळणे सुरू ठेवणार आहे. धोनीने म्हटले होते, मी नेहमीच माझा क्रिकेट प्लान केला आहे. माझा शेवटचा सामना रांचीमध्ये होता. आशा आहे की माझी शेवटची टी-२० मॅचही चेन्नईमध्ये असेल. मग ते पुढील पाच वर्षात असेल वा नसेल. 

दिल्लीचे ४ खेळाडू ठरले

दिल्ली कॅपिटल्सनेही आपले ४ खेळाडू ठरवले आहेत. दिल्लीने कर्णधार ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेलला रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर परदेशी खेळाडू एनरि नॉर्खियाला रिटेन केले जाणार आहे. 

आयपीएल २०२२ भारतात

आयपीएल २०२२ स्पर्धेचे आयोजन भारतात होणार आहे. हा आयपीएल स्पर्धेचा पंधरावा हंगाम असेल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे. याआधी आयपीएल २०२१ स्पर्धेची सुरुवात भारतात झाली. पण काही खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे आयपीएल काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. स्पर्धेचे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी