Chetan Sharma Resigns: चेतन शर्मांचा डाव संपला; स्टिंग ऑपरेशनच्या वादानंतर निवड समितीचे अध्यक्षांचा राजीनामा

Chetan Sharma resign : स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (Bcci) मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा Chetan Sharma) यांनी राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह (jay shah) यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो स्वीकारला असल्याची माहिती समोर आली आहे.

Chetan Sharma Resigns
चेतन शर्मांनी BCCI कडे सोपवला राजीनामा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • झी न्यूजने गेम ओव्हर नावाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्माने अनेक वादग्रस्त विधाने केली होती.
  • 7 जानेवारी 2023 रोजी नव्याने समिती स्थापन केल्यावर शर्मा यांना कायम ठेवण्यात आले होते.
  • क्रिकेट चाहत्यांनी चेतन शर्मावर कारवाई करण्याची मागणी बीसीसीआयकडे केली होती.

Chetan Sharma resign : एका टीव्ही चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (Bcci) मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा Chetan Sharma) यांनी राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह (jay shah) यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो स्वीकारला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वृत्त लिहिपर्यंत बीसीसीआयने चेतन शर्माच्या राजीनाम्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.  (Chetan Sharma Resigns: Selection committee chairman Chetan Sharma resigns after sting operation controversy )

अधिक वाचा  : मराठमोळा शिव ठाकरे या गोष्टींमुळे राहिला दुसऱ्या स्थानावर

40 दिवसात संपला डाव 

टी20 विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारत बाद झाल्यानंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समितीची हकालपट्टी केली होती. यानंतर 7 जानेवारी 2023 रोजी नव्याने समिती स्थापन केल्यावर शर्मा यांना कायम ठेवण्यात आले. मात्र यावेळी 40 दिवसांनंतर त्यांना पद सोडावे लागले. दुखापतीनंतर पूर्ण तंदुरुस्त नसतानाही मैदानावर पुनरागमन करण्यासाठी काही भारतीय क्रिकेटपटू विशिष्ट इंजेक्शन घेत असल्याचा गौप्यस्फोट चेतन शर्मा यांनी केला होता. त्यानंतर आता शर्मा यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अधिक वाचा  : चंद्राची पाहून अदा अनेक सर्जेराव फिदा

शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक वादग्रस्त विधाने केली

झी न्यूजने गेम ओव्हर नावाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्माने अनेक वादग्रस्त विधाने केली होती. टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंच्या फिटनेसबाबत त्यांनी मोठे वक्तव्य केले होते.  त्यांनी सौरभ गांगुली आणि विराट कोहलीमधील वादावरही अनेक खुलासे केले होते. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याचं शर्मा म्हणाले होते. या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर ते वादात सापडले होते. 

अधिक वाचा  : साई काय केलं होतं बाई; वडिलांना काय आवडलं नाही

सोशल मीडियावरही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती. क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बीसीसीआयकडे केली होती. अशातच चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयने 7 जानेवारी रोजी चेतन शर्मा व्यतिरिक्त शिवसुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांना नवीन निवड समितीमध्ये संधी दिली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी