IND vs SL : अजिंक्य रहाणे आणि पुजाराचा होणार पत्ता कट; सुनिल गावस्करांचा दावा, या खेळाडूंना मिळणार संधी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 15, 2022 | 17:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Sri Lanka Test Series | भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. यजमान दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बळी राखून विजय मिळवला. यासोबतच संघाने २-१ ने मालिकेवर कब्जा केला. दरम्यान भारतीय संघाला आता फेब्रुवारी-मार्च दरम्यान श्रीलंकेसोबत २ सामन्यांची मालिका खेळायची आहे.

Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane could be ruled out of Test series against Sri Lanka said Sunil Gavaskar
अजिंक्य रहाणे आणि पुजाराचा होणार पत्ता कट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फेब्रुवारी ते मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यात २ सामन्यांची मालिका होणार आहे.
  • आगामी मालिकेत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला वगळले पाहिजे, गावस्करांनी मांडले मत.
  • श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारीला संधी दिली पाहिजे.

India vs Sri Lanka Test Series | नवी दिल्ली : भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या (India vs South Africa) कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. यजमान दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बळी राखून विजय मिळवला. यासोबतच संघाने २-१ ने मालिकेवर कब्जा केला. दरम्यान भारतीय संघाला आता फेब्रुवारी-मार्च दरम्यान श्रीलंकेसोबत (India vs Sri lanka) २ सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशातच भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटर सुनिल गावस्कर यांनी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ बदल करण्याबाबत भाष्य केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे घरच्या मैदानावर भारतीय संघाचे प्रदर्शन शानदार राहिले आहे. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये श्रीलंका सध्या अव्वल स्थानावर आहे, तर भारत ५ व्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत. (Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane could be ruled out of Test series against Sri Lanka said Sunil Gavaskar).

सुनिल गावस्करांनी एका वृत्तवाहिनीवर कॉमेंट्री करताना म्हटले की आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेत खराब प्रदर्शन करणाऱ्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) आगामी श्रीलंकेविरूध्दच्या मालिकेतून बाहेर केले पाहिजे. त्यांनी म्हटले की, "मला वाटते अजिंक्य रहाणे फक्त बाहेरच होणार नाही. तर त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळेल. त्याने न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेत स्वत:ला सिध्द केले होते. त्याने पूर्ण मालिकेत प्रभावशाली खेळी केली होती." लक्षणीय बाब म्हणजे अय्यरने त्याच्या कसोटीतील पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावले होते. 

अय्यर आणि विहारीला मिळणार संधी

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्करांनी आणखी सांगितले की, मला वाटते की चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनाही आगामी श्रीलंका मालिकेतून बाहेर केले जाईल. श्रेयस अय्यर सोबतच हनुमा विहारीला (Hanuma Vihari) संधी मिळेल. त्यांनी म्हटले अय्यर आणि विहारी दोघेही श्रीलंकेविरूध्द खेळू शकतात. विहारीला नंबर ३ वर पुजाराच्या जागी तर अय्यरला ५ नंबरवर रहाणेच्या जागी खेळवायला पाहिजे. माझ्या मते हे दोन बदल आवश्यक असल्याचे गावस्करांनी अधिक सांगितले. 

कोहलीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष 

दरम्यान, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अद्यापही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या बाजूने आहे. दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत पुजाराने ६ डावात २१ च्या औसतनुसार १२४ धावा केल्या. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर अजिंक्य रहाणेने ६ डावात २३ च्या औसतनुसार १३६ धावा केल्या. त्याने देखील एक अर्धशतकीय खेळी केली. लक्षणीय बाब म्हणजे दोघांच्याही खेळीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताकडून मालिकेत के.एल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक धावा केल्या. त्याने ६ डावात ३८ च्या सरासरीनुसार २२६ धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकीय खेळीचा समावेश आहे. ऋषभ पंतने देखील शेवटच्या कसोटीत शतक झळकावले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी