पुजाराने सिक्सर मारून चॅलेंज केले पूर्ण, आर अश्विन अर्धी मिशी कापणार का?

r ashwin challenge gon viral टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने न्युझीलंडविरोधातील सामन्यात उत्तम कामगिरी बजावली. पुजाराने ५१ चेंडूत २९ धावा केल्या. तसेच नाबादही राहिला. या सामन्यात त्याने तीन चौकार आणि एक षटकारही ठोकले.

cheteshwar pujara hit six r ashwin
पुजाराने सिक्सर मारून अश्विनचे चॅलेंज केले पूर्ण  
थोडं पण कामाचं
  • आर अश्विनने चेतेश्वर पुजाराला चॅलेंज दिले होते.
  • एजाझ पटेलच्या बॉलवर पुजाराने षटकार ठोकला होता.
  • पुजाराने सिक्सर मारून अश्विनचे चॅलेंज पूर्ण केले आहे.

cheteshwar pujara hit six r ashwin challenge gon viral  मुंबईः टीम इंडियाचा (team india)  फलंदाज चेतेश्वर पुजाराने (cheteshwar pujara)  न्युझीलंडविरोधातील (Newzeland) सामन्यात उत्तम कामगिरी बजावली. पुजाराने ५१ चेंडूत २९ धावा केल्या. तसेच नाबादही राहिला. या सामन्यात त्याने तीन चौकार आणि एक षटकारही ठोकले. संपूर्ण टीम इंडियाची विकेट घेणार्‍या एजाझ पटेलच्या बॉलवर पुजाराने षटकार ठोकला होता. आता पुजाराने सिक्सर मारून अश्विनचे चॅलेंज पूर्ण केले आहे. 

आर अश्विनने चेतेश्वर पुजाराला चॅलेंज दिले होते. जर पुजाराने टेस्ट मॅचमध्ये षटकार ठोकला तर मी अर्धी मिशी ठेवेने असे म्हटले होते.

जानेवारी महिन्यात अश्विनने आपल्या युट्युब चॅनेलच्या एका कार्यक्रमात प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याशी बातचीत केली. तेव्हा चेतेश्वर पुजाराने जर टेस्ट मॅचमध्ये सिक्स मारला तर मी अर्धी मिशी ठेवून मैदानात उतरेल असे म्हटले होते. आता न्युझीलंड विरोधात झालेल्या सामन्यात पुजाराने चौकार आणि षटकार ठोकले आहे. त्यामुळे नेटकर्‍यांनी अश्विनला या चॅलेंजची आठवण करून दिली आहे.

विक्रम राठोड अश्विनला एकदा तरी हवेत शॉट मारण्यासाठी सांगत होते. परंतु हे आपल्याला जमणार नसल्याचे अश्विनने म्हटले होते. बोलताना अश्विन म्हणाल होता की इंग्लंड विरोधातील टेस्ट सामन्यात चेतेश्वर पुजारा सिक्सर मारेल तर मी अर्धी मिशी ठेवून मैदनात खेळायला येईन. आता चेतेश्वरने न्युझीलंडविरोधात ही कामगिरी केली आहे. अश्विन खरच अर्धी मिशी ठेवून खेळायला  येईल का यावर सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी