मुंबई: खराब फॉर्ममुळे संघाबाहेर असलेला भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजाराने(cheteshwar pujara) काऊंटी क्रिकेटमध्ये(county cricket) धमाल केली आहे. या वर्षी आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने दुहेरी शतक(double century) ठोकले. पुजाराच्या या शानदार खेळीच्या जोरावर टीम ससेक्सला हा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळाले. पुजाराने या दरम्यान ३८७ बॉलचा सामना करताना २३ चौकारांच्या मदतीने २०१ धावांची नाबाद खेळी केली. यात त्याला टॉम हेन्सने चांगली साथ दिली. त्याने २४३ धावांची खेळी केली. cheteshwar pujara scores double century in county cricket
अधिक वाचा- देशांतर्गत हवाई प्रवासासाठी यापुढे RT-PCR अनिवार्य नाही
काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये पुजारा दुहेरी शतक ठोकणारा दुसरा भारतीय ठरला आहे. त्याआधी माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने दोन वेळा ही कामगिरी केली होती. १९९१मध्ये त्याने लीस्टशायरविरुद्ध २१२ आणि १९९४मध्ये डरहमविरुद्ध २०५ धावांची खेळी केली होती. ही दोन्ही शतके त्याने डर्बीायरसाठी खेळताना ठोकली होती. इफ्तिखार अली खान पटौदी यांच्या नावावरही काऊंटी क्रिकेटमध्ये चार दुहेरी शतके आहेत. मात्र त्यांनी हा स्कोर जेव्हा ते इंग्लिश क्रिकेट टीमचे क्रिकेटर होते तेव्हा केला होता.
चेतेश्वर पुजाराने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ५२ डावानंतर शतक ठोकले आहे. त्याने शेवटचा १०० धावांचा आकडा जानेवारी २०२०मध्ये कर्नाटकविरुद्ध पार केला होता. या दोन वर्षात त्याने १४ अर्धशतकांच्या मदतीने ३०.३६च्या सरासरीने १५१८ धावा केल्या होत्या.
अधिक वाचा - मुंबई पोलिसांची जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर करडी नजर
पुजाराच्या या डावाच्या जोरावर टीम ससेक्स आपला पराभव टाळण्यास यशस्वी ठरली. डर्बीशायरने पहिल्या डावात ८ बाद ५०५ धावा करत घोषित केला. याच्या प्रत्युत्तरात ससेक्सचा संघ पहिल्या डावात १७४ धावांवर बाद झाला. त्यांना फॉलोऑन देण्यात आला. पुजाराने पहिल्या डावात ६ धावा केल्या होत्या. शेवटच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ससेक्सने दुसऱ्या डावात ३ बाद ५१३ धावा केल्या आणि हा सामना अनिर्णीत ठरला.