चेतेश्वर पुजाराने ९० बॉलमध्ये ठोकले १३२ रन्स, झळकावले तिसरे शतक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 24, 2022 | 12:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

चेतेश्वर पुजाराने रॉयल लंडन वनडे कपमध्ये ससेक्स टीमसाठी हंगामातील तिसरे शतक ठोकले आहे. पुजाराने ससेक्सकडून खेळताना मिडिलसेक्सविरुद्ध केवळ ९० बॉलमध्ये १३२ धावा केल्या.

cheteshwar pujara
पुजाराने ९० बॉलमध्ये ठोकले १३२ रन्स, झळकावले तिसरे शतक 
थोडं पण कामाचं
  • मंगळवारी ससेक्सचा सामना मिडिलसेक्स संघाविरुद्ध झाला.
  • यात ससेक्सने १५७ धावांनी विजय मिळवला.
  • सामन्यात इंग्लंडचा ओपनर टॉम अलसोपने ११५ बॉलवर १८९ धावांची खेळी केली.

मुंबई: भारतीय कसोटी संघाची द वॉल म्हटल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमध्ये फॉर्म जबरदस्त आहे. पुजारा रॉयल लंडन वनडे कपमध्ये ससेक्ससाठी जबरदस्त फलंदाजी करत आहे. पुजाराने मंगळवारी रॉयल लंडन वनडे कपमध्ये हंगामातील आपले तिसरे शतक ठोकले. पुजाराने ससेक्सकडून खेळताना मिडिलसेक्सविरुद्ध केवळ ९० बॉलमध्ये १३२ धावांची तुफानी खेळी केली. cheteshwar pujara scores132 runs in royal london oneday cup

खरंतर, मंगळवारी ससेक्सचा सामना मिडिलसेक्स संघाविरुद्ध झाला. यात ससेक्सने १५७ धावांनी विजय मिळवला. सामन्यात इंग्लंडचा ओपनर टॉम अलसोपने ११५ बॉलवर १८९ धावांची खेळी केली. तर पुजाराने ९० बॉलमध्ये १३२ धावा ठोकल्या

अधिक वाचा - गर्दी कमी करण्यासाठी येरवडा कारागृहातून ४१८ कैद्यांची सुटका

त्याने आधी ६४ बॉलवर ७० धावा केल्या आणि पुढील २६ बॉलमध्ये ६२ धावा ठोकल्या. भारतीय फलंदाजाने आपल्या डावादरम्यान २३८.४४च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. पुजाराने केवळ ७५ बॉलवर आपले शतक पूर्ण केले. तर रॉयल लंडन वनडे कपमध्ये ससेक्ससाठी आतापर्यंत ९,६३, नाबाद १४, १०७, १७४, नाबाद ४९, ६६ आणि १३२ धावांची खेळी केली आहे. या स्पर्धेत त्याने आपल्या ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. 

संघाचे नेतृत्व करत असलेल्या पुजाराने आपल्या आक्रमक खेळीत २० चौकार आणि दोन षटकार ठोकले. सलामी फलंदाज टॉम एलसोपपने १५५ बॉलमध्ये १८९ धावांची खेळी केली. पुजारा आणि एलसोपने तिसऱ्या विकेटसाठी २४० धावांची भागीदारी केली. पुजाराने गोलंदाजांची धुलाई करत स्पर्धेत बॅक टू बॅक दुसरे शतक ठोकले. याआधी त्याने वारविकशायरविरुद्ध ७३ बॉलवर शतक ठोकले होते. 

पुजारा आणि टॉमच्या खेळीच्या जोरावर पहिल्यांदा बॅटिंग करताना ससेक्स टीमने ४०० धावांचा स्कोर केला. याच्या प्रत्युत्तरात मिडिलसेक्सचा संपूर्ण संघ ३८.१ ओव्हरमध्ये २४३ धावांवर गारद झाला. 

अधिक वाचा - मराठी सिनेमा वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या दिग्दर्शकाचा वाढदिवस

पुजाराची १७४ धावांची खेळी

या शतकासह पुजारा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत रॉयल लंडन वनडे कप ८ सामने खेळलेत. यात त्याने १०२.३३च्या सरासरीने ६१४ धावा केल्या. पुजाराचे या स्पर्धेतील तिसरे शतक आहे. या दरम्यान त्याचा बेस्ट स्कोर १७४ इतका आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी