IND vs NZ: राहुल द्रविडच्या ड्रेसिंग रूममध्ये असण्याने...पुजाराचे विधान 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 24, 2021 | 15:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs NZ Test:भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये पहिली कसोटी खेळवली जात आहे. या सामन्यातील उप कर्णधार चेतेश्वर पुजाराने कोच राहुल द्रविडबाबत विधान केले आहे. 

rahul dravid
राहुल द्रविडच्या ड्रेसिंग रूममध्ये असण्याने...पुजाराचे विधान 
थोडं पण कामाचं
  • चेतेश्वर पुजाराने कोच द्रविडच्या ड्रेसिंग रुममधील उपस्थितीतबाबत मोठा खुलासा केला आहे.
  • द्रविडच्या ड्रेसिंग रूममध्ये राहण्याचा जास्त फायदा खेळाडूंना होईल.
  • इतकंच नव्हे तर आमच्यासारख्या अनुभवी खेळाडूंनाही त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारपासून कानपूर येथे पहिला कसोटी सामना (IND vs NZ Test Series) खेळवला जात आहे. राहुल द्रविड(Rahul Dravid)चा टीम इंडियाचा हेड कोच म्हणून पहिला कसोटी सामना असणार आहे अशातच तो जिंकण्यासाठी खास रणनीती तयार करत आहे. या कसोटीआधी चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) कोच द्रविडच्या ड्रेसिंग रुममधील उपस्थितीतबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की द्रविडच्या ड्रेसिंग रूममध्ये राहण्याचा जास्त फायदा खेळाडूंना होईल. खासकरून त्या युवा खेळाडूंना ज्यांनी राहुल भाईंच्या देखरेखीखाली अंडर १९ अथवा इंडिया ए संघात खेळले आहेत. इतकंच नव्हे तर आमच्यासारख्या अनुभवी खेळाडूंनाही त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. cheteshwar pujara statement about rahul dravid

चेतेश्वर पुजारा कानपूरमधील सराव सत्राच्या आधी सांगितले, मी राहुल द्रविडसोबत ए सीरीजदरम्यान काम केले आहे. यासाठी आम्ही सगळेच त्यांच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करत आहोत. एक खेळाडू आणी संघाचे कोच म्हणून त्यांच्याकडे जो अनुभव आहे त्यामुळे खूप मदत मिळते. आपल्या फलंदाजीबाबत बोलताना पुजारा म्हणाला, ३ वर्षांपासून कसोटीत शतक न ठोकल्याने तो दुखी आहे.

इंग्लंडमधील आक्रमक खेळाचा पुजाराला मिळाला फायदा

इंग्लंड दौऱ्यावर टीका झेलल्यानंतर आक्रमक फलंदाजीने मदत केली? यावर पुजारा म्हणाला, हा मला असे वाटते आहे. मला नाही वाटत की टेक्निकमध्ये मोठा बदल झाला आहे. हा केवळ दृष्टिकोन होता  आणि मी थोडा निडर होतो जे मदत करते. तसेच त्याने यावेळी मान्य केले की तो स्वत:वर खूप दबाव टाकत होता. दरम्यान, लीड्समध्ये ९१ आणि ओव्हलमध्ये ६१ धावा केल्यानंतर त्याच्या विचारात बदल झाले होते. पुजाराने पुढे सांगितले, तुम्हाला तुमच्या स्वत:वर अधिक दबाव टाकण्याची गरज नाही. फक्त प्रयत्न करा आणि तिथे जाऊन खेळाचा आनंद घ्या. 

उप-कर्णधारपदाने कोणताही त्रास नाही. 

पुजारा कानपूर कसोटीसाठी मिळालेल्या उप-कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे चिंतित नाही. त्याने सांगितले, अतिरिक्त जबाबदारी चांगली असू शकते आणि कधी कधी तुमच्या हक्काने काम करते. मात्र याचा अर्थ असा नाही की ते कोणत्याही जबाबदारीशिवाय ज्युनियर खेळाडूंना मेंटाँर करणार नाही. पुजाराचे म्हणणे आहे की वरिष्ठ खेळाडू असल्याच्या नात्याने आपले अनुभव युवा खेळाडूंसोबत जरूर शेअर केले पाहिजेत. यामुळे संघाला फायदा होतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी