IND vs PAK : युनिर्व्हर्स बॉस क्रिस गेलवर भारत-पाकिस्तान सामन्याचा फिव्हर, शेअर केला फोटो

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 15, 2019 | 21:13 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

भारत आणि पाकिस्तान सामन्याचा फिव्हर संपूर्ण जगभरात चढला आहे. याचा फिव्हर युनिव्हर्स बॉस क्रिस गेलवरही पाहायला मिळत आहे. गेल वेगळ्याच अंदाजात या सामन्याला सपोर्ट करत आहे.

chris gayle
क्रिस गेल  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना १६ जूनला खेळवला जाणार आहे. या सामन्याचा फिव्हर संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांवर आहे. याचा फिव्हर युनिव्हर्स बॉस म्हटल्या जाणाऱ्या क्रिस गेलवरही चढला आहे. गेलही भारत-पाकिस्तान सामन्याबाबत खूपच उत्सुक आहे. गेलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. तो या अंदाजात भारत पाकिस्तान सामन्याला सपोर्ट करताना दिसत आहे. 

या सामन्याआधी गेलने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो भारत आणि पाकिस्तान सामन्याला एक वेगळ्याच रंगाचा सूट घालून सपोर्ट करत आहे. गेल अनेकदा आपल्या बिंदास अंदाजाने चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. युनिव्हर्स बॉस केवळ आपल्या फलंदाजीने तर आपल्या मजेशीर अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, या वर्ल्डकपमध्ये गेलची बॅट तितकी तळपताना दिसत नाही आहे.

 

वेस्ट इंडिजची गाडी पहिल्या सामन्यानंतर ट्रॅकवरून उतरलेली दिसत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या खराब प्रदर्शनाचे कारण कुठे ना कुठे गेलचे फॉर्ममध्ये न येणे आहे. गेल आपल्या प्रतिष्ठेनुसार कामगिरी करताना दिसत नाही आहे. अशातच वेस्ट इंडिजला जर सेमीफायनलचा टप्पा गाठायचा असेला तर त्यांना आगामी सर्व सामन्यांमध्ये क्रिस गेलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणे गरजेचे आहे. 

आता ही स्पर्धा अशा टप्प्यावर येऊन पोहोचली आहे जिथे वेस्ट इंडिजला आता सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. अशातच कॅरेबियन फलंदाज तसेच गोलंदाज यांना सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. यामुळेच वेस्ट इंडिजसाठी वर्ल्डकपमधील स्पर्धेत टिकून राहण्याची शक्यता आहे. अन्यथा त्यांना वर्ल्डकपबाहेर जावे लागेल.

वेस्ट इंडिज संघाने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये ४ सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला. तर दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. पॉईंटटेबलमध्ये भारत चौथ्या स्थानावर आहे. भारताचे वर्ल्डकपमधील तीन सामने झाले. यापैकी भारताला दोन सामन्यांत विजय मिळाला तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. १६ जूनला भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यासाठी पूर्णणे सज्ज असल्याचे म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IND vs PAK : युनिर्व्हर्स बॉस क्रिस गेलवर भारत-पाकिस्तान सामन्याचा फिव्हर, शेअर केला फोटो Description: भारत आणि पाकिस्तान सामन्याचा फिव्हर संपूर्ण जगभरात चढला आहे. याचा फिव्हर युनिव्हर्स बॉस क्रिस गेलवरही पाहायला मिळत आहे. गेल वेगळ्याच अंदाजात या सामन्याला सपोर्ट करत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola