Chris Morris Retirement : IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त; या संघाचा झाला प्रशिक्षक

Chris Morris Retires From Cricket | आयपीएल २०२२ च्या आगामी लिलावाच्या एक महिन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर क्रिस मॉरिसने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून संन्यासाची घोषणा केली आहे. क्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता जेव्हा राजस्थान रॉयल्सच्या संघाने आयपीएल २०२१ साठी त्याला १६.२५ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले होते. क्रिस मॉरिसने सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली.

Chris Morris the most expensive man in IPL history has retired from all forms of cricket
IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूने घेतली निवृत्ती   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • क्रिस मॉरिसने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली.
  • क्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू राहिला आहे.
  • क्रिस मॉरिस आता दक्षिण आफ्रिकेतील टायटन संघाचा प्रशिक्षक असेल.

Chris Morris Retires From Cricket | जोहान्सबर्ग : आयपीएल २०२२ च्या आगामी लिलावाच्या एक महिन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) ऑलराउंडर क्रिस मॉरिसने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून संन्यासाची घोषणा केली आहे. क्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता जेव्हा राजस्थान रॉयल्सच्या संघाने आयपीएल २०२१ साठी त्याला १६.२५ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले होते. क्रिस मॉरिसने सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. क्रिस मॉरिस आता दक्षिण आफ्रिकेतील टी-२० टायटन संघाच्या प्रशिक्षक पदाच्या भूमिकेत दिसेल. क्रिस मॉरिसने त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटच्या माध्यमातून म्हटले की, 'आज मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून संन्यासाची घोषणा करत आहे. त्या सर्वांना धन्यवाद, ज्यांनी माझ्या या प्रवासात लहान किंवा मोठ्या प्रकारे भूमिका निभावली. हा एक आनंददायी प्रवास राहिला. टायटनमध्ये कोचिंगची भूमिका मिळाल्याचा मला सन्मान वाटतो." (Chris Morris the most expensive man in IPL history has retired from all forms of cricket). 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chris Morris (@tipo_morris)

क्रिस मॉरिसने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) एकूण ८१ सामने खेळले असून २२.०७ च्या सरासरीने ६१८ धावा केल्या आणि ९५ बळी घेतले आहेत. आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना मॉरिसने ११ सामन्यांमध्ये १५ बळी पटाकावत ६७ धावा केल्या होत्या. तर क्रिस मॉरिसने २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने ४ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि २३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ३४ वर्षीय अष्टपैलू मॉरिसने ४ कसोटीत १७३ धावा आणि १२ बळी घेतले आहेत. तर ४२ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ४६७ धावा आणि ४८ बळी घेतले आहेत. तसेच २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मॉरिसने १३३ धावा आणि ३४ बळी पटकावले आहेत.

Also Read : भारतात सुरू होणार गोल्ड ट्रेडिंग, असा होईल व्यवहार

क्रिस मॉरिसने ६ जुलै २०१९ रोजी मँचेस्टरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर अनुभवी अष्टपैलू खेळाडूला दोन वर्षे आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करता आले नाही. याशिवाय फ्रँचायझी क्रिकेटमध्येही तो आपल्या कामगिरीने काही उल्लेखणीय कामगिरी करू शकला नाही. आगामी हंगामात मॉरिस टायटनच्या प्रशिक्षक पदाची भूमिका कशी भूषवतो हे पाहण्याजोगे असेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी