IND vs ENG: राहुल द्रविडला नकोय विराट कोहलीकडून बर्मिंगहॅम कसोटीत शतक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 30, 2022 | 18:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

virat kohli: विराट कोहलीकडून इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅममध्ये खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या कोचला विराट कोहलीकडून शतकाची अपेक्षा नाही. 

virat kohli and rahul dravid
राहुल द्रविडला नकोय विराट कोहलीकडून बर्मिंगहॅम कसोटीत शतक 
थोडं पण कामाचं
  • राहुलला वाटते की विराटने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मॅच विनिंग खेळी करावी
  • २०१९नंतर विराटने एकही शतक ठोकलेले नाही
  • १ जुलैपासून सुरू होणार सामना

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या(virat kohli) बॅटमधून गेल्या दोन वर्षांपासून एकही कसोटी शतक निघालेले नाही त्यामुळे त्याचे चाहते नक्कीच चिंतेत आहेत. मात्र कोच राहुल द्रविडला(rahul dravid) याबाबत चिंता नाही. त्यांनी बुधवारी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सांगितले की त्यांना विराटकडून मॅच विनिंग खेळाची अपेक्षा आहे भले त्याने यावेळी शतक केले नाही तरी चालेल. coach Rahul dravid don't want century from virat kohli in test match against england

अधिक वाचा - करपात्री महाराजांनी इंदिरा गांधींना दिला होता हत्येचा शाप

विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक ठोकलेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत विराट कोहलीने कोलकातामध्ये शतक ठोकले होते. २७ कसोटी शतक ठोकल्यानंतर गेल्या दोन-अडीच वर्षात या संख्येत अजिबात वाढ झालेली नाही. 

जगातील सर्वात मेहनती खेळांडूंपैकी एक आहे विराट

द्रविडने सांगितले, तो एक फिट खेळाडू आहे आणि मी ज्या क्रिकेटर्सना पाहिले आहे त्यापैकी सगळ्यात कठीण मेहत करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याची क्रिकेट खेळण्याची इच्छा, भूक, स्वत:ला चांगला ठेवण्याचा अॅटिट्यूड जबरदस्त आहे. त्याने लीस्टरशायरविरुद्ध जी कामगिरी केली होती ती जबरदस्त होती. ज्या पद्धतीची तिथे परिस्थिती होती तेथे त्याने ५०-६० धावांची खेळी केली.

अधिक वाचा -  VIDEO:जेवायला बसलेल्या कुटुंबावर अचानक कोसळला सिलिंग फॅन अन्

विराट आपण बनवलेल्या मापदंडाची ठरला शिकार

विराट शतक ठोकू शकत नसण्याबाबत द्रविड म्हणाला, खेळाडू विविध मानसिक दौऱ्यातून जातात आणि मला नाही वाटतं की विराटमध्ये प्रेरणेची कमतरता आहे. नेहमी शतकावरच जोर का दिला जावा. केपटाऊनमद्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कठीण परिस्थितीतही त्याने बनवलेल्या ७९ धावा जबरदस्त होत्या. तो तीन अंकी संख्येपर्यंत पोहोचू शकला नाही मात्र ती खेळी चांगली होती. त्याने इतके मोठे मापदंड स्थित केलेत की लोक शतकालाच यशस्वी मानत नाही मात्र एक कोचच्या नजरेतून त्याच्याकडून मला विजयी खेळीची अपेक्षा आहे मग त्या ५० अथवा ६० धावा असोत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी