बर्मिंगहम : राष्ट्रकुल स्पर्धेच्या (Commonwealth Games) बॅडमिंटनच्या (Badminton) सांघिक सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधूने (P.V.Sindhu) दमदार कामगिरी करत विजय मिळवला. पण भारताच्या अन्य बॅडमिंटनपटूंना दमदार खेळ खेळता करता आला नाही. त्यामुळेच भारताला सुवर्णपदकाने (gold medal) हुलकावणी दिली. गोल्ड मेडल हातातून गेल्यानंतर भारताला यावेळी बॅडमिंटनच्या सांघिक गटाला रौप्यपदकावर (silver medal) समाधान मानावे लागले. भारताला ३-१ अशी मात मलेशियाने सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
दरम्यान, भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सिंधूने दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले. सिंधूने मलेशियाच्या गोह जिन वेईवर सरळ दोन गेम्समध्ये विजय साकारल्याचे पाहायला मिळाले. सिंधूने पहिल्या गेममध्ये २२-२० अशी बाजी मारली. पहिल्या गेममध्ये सिंधू आणि वेई यांच्यामध्ये चुरशीचा सामना झाला, पण सिँधूने अनुभव पणाला लावला आणि पहिले गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सिंधूने धडाकेबाज खेळ केला. दुसरा गेम सिंधूने २१-१७ असा जिंकला आणि वेईवर विजय साकारला. सिंधूच्या विजयामुळे भारताला मलेशियाबरोबर १-१ अशी बरोबरी करता आली.
Read Also : तिसऱ्या T20 सामन्यामध्ये चमकला सूर्यकुमार ठोकल्या 76 धावा
किदम्बी श्रीकांतकडून भारताला यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्याला मलेशियाच्या टिझयंगकडून १९-२१, २१-६ आणि १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा भारत १-२ अशा पिछाडीवर पडला. त्यानंतर भारत आणि मलेशिया यांच्यामध्ये महिला दुहेरीचा निर्णायक सामना सुरू झाला. हा सामना गमावल्यावर भारताला सुवर्णपदक हुलकावणी देऊ शकत होते.
या सामन्यात भारताची चांगली सुरुवात झाली नाही. गायत्री गोपिचंद आणि थ्रीसा जॉली यांनी मलेशियाच्या मुरलीथरन थिनाह आणि कुंग ले पीअर्ली तान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले.
Read Also : गृहमंत्रालयात नोकरीची संधी...92,300 पर्यंत पगार
तत्पूर्वी, भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक रानकीरेड्डी यांचा सामना आजच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या टेंग फाँग आणि वुई इक सो यांच्याबरोबर झाला. या सामन्यातील पहिला गेम चांगलाच रंगतदार झाला. पण भारताला पहिल्या गेममध्ये तीन गुणांनी पराभव पत्करावा लागला. भारताने पहिला १८-२१ असा गमावला होता. दुसऱ्या गेममध्येही ही भारताची जोडी ७-११ अशी पिछाडीवर होती. दुसरा गेम या जोडीने १५-२१ असा गमावला आणि भारत ०-१ अशा पिछाडीवर पडला.