Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत असा आहे भारताचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम

बाविसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेला ब्रिटनच्या बर्मिंघम शहरात सुरुवात झाली. जाणून घेऊया बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत काय आहे भारताचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम

Commonwealth Games 2022 Day one Schedule of Indian Contingent at Birmingham
राष्ट्रकुल स्पर्धेत असा आहे भारताचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत असा आहे भारताचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम
  • बाविसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेला ब्रिटनच्या बर्मिंघम शहरात सुरुवात
  • जाणून घेऊया बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत काय आहे भारताचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम

बर्मिंघम : बाविसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेला ब्रिटनच्या बर्मिंघम शहरात सुरुवात झाली. भारत टोकियो ऑलिंपिकप्रमाणे राष्ट्रकुलमध्येही उत्तम कामगिरी करण्यासाठी तयारीनिशी आला आहे. याआधी २०१० मध्ये भारतात दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती. भारताने २०१० मध्ये राष्ट्रकुल मधील देशाची सर्वोत्तम कामगिरी नोंदविली होती. या कामगिरीची पुनरावृत्ती करणे भारताला अद्याप जमलेले नाही. यंदा भारतीय खेळाडू काय कामगिरी करतात याकडे अनेकांचे लक्ष आहे. । क्रीडा / क्रिकेटकिडा

बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे २०५ अॅथलीट सहभागी झाले आहेत. भारत १६ खेळांमध्ये १३३ सुवर्ण पदकांसाठी स्पर्धेत उतरणार आहे. ऑलिंपिकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नाही. पण इतर खेळाडूंकडून क्रीडाप्रेमींना आशा आहे. 

जाणून घेऊया बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत काय आहे भारताचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम

जलतरण

कुशाग्र रावत - ४०० मीटर फ्री स्टाइल हीट (दुपारी ३ वा.)
आशीष कुमार सिंह - १०० मीटर बॅकस्ट्रोक एस9 हीट (दुपारी ३ वा.)
साजन प्रकाश - ५० मीटर बटरफ्लाय हीट (दुपारी ३ वा.)
श्रीहरी नटराज - १०० मी बॅकस्ट्रोक एच (दुपारी ३ वा.)
कुशाग्र रावत - (पात्र झाल्यास) - ४०० मीटर फ्री स्टाइल फायनल (रात्री ११.३० वा.)
आशीष कुमार सिंह - (पात्र झाल्यास) - १०० मीटर बॅकस्ट्रोक एस9 फायनल (रात्री ११.३० वा.)
साजन प्रकाश - (पात्र झाल्यास) - ५० मीटर बटरफ्लाय सेमी (रात्री ११.३० वा.)
श्रीहरी नटराज - (पात्र झाल्यास) - १०० मीटर बॅकस्ट्रोक सेमी (रात्री ११.३० वा.)

बॉक्सिंग (मुष्टीयुद्ध)

शिव थापा : पुरुष ६३.५ किग्रा, राउंड ३२ (संध्याकाळी ४.३० वा.)
सुमित कुंडु : पुरूष ७५ किग्रा, राउंड ३२ (संध्याकाळी ४.३० वा.)
रोहित टोकस : पुरूष ६७ किग्रा, राउंड ३२ (रात्री ११ वा.)
आशीष चौधरी : पुरूष ८० किग्रा, राउंड ३२ (रात्री ११ वा.)

जिमनॅस्टिक्स

योगेश्वर, सत्यजीत, सैफ - पुरुष वैयक्तिक आणि टीम पात्रता (रात्री १.३० वा.)
पुरुष टीम फायनल : (पात्र झाल्यास) (रात्री १० वा.)

क्रिकेट

भारतीय महिला क्रिकेट टीम विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम ( दुपारी ३.३० वा.)

हॉकी 

भारत विरुद्ध घाना : महिला ग्रुप फेरी (संध्याकाळी ६.३० वा.)

लॉन बॉल्स 

नयानमोनी - महिला एकेरी (दुपारी १ वा.)
दिनेश, नवनीत, चंदन - पुरूष ट्रिपल्स (दुपारी १ वा.)
सुनील, मृदुल - पुरूष पेअर फेरी १ (संध्याकाळी ७.३० वा.)
रूपा, तानिया, लवली - महिला फोर फेरी १ (संध्याकाळी ७.३० वा.)

स्क्वाश 

सौरव, रमित, अभय - राउंड ६४ (संध्याकाळी ४.३० वा.)
जोशना, सुनैना, अनहत - राउंड ६४ (संध्याकाळी ४.३० वा.)
पुरुष एकेरी : राउंड ६४ (रात्री १०.३० वा.)
महिला एकेरी : राउंड ६४ (रात्री १०.३० वा.)

टेबल टेनिस

पुरुष टीम - पात्रता फेरी १ (दुपारी २ वा.)
महिला टीम- पात्रता फेरी १ (दुपारी २ वा.)
पुरुष टीम- पात्रता फेरी २ (रात्री ८.३० वा.)
महिला टीम- पात्रता फेरी २ (रात्री ८.३० वा.)

ट्र्रॅक सायकलिंग

विश्वजीत, नमन, वेंकप्पा, अनंत, दिनेश- पुरुष टीम परसुईट पात्रता (दुपारी २.३० वा.)
मयूरी, त्रियशा, शुशिकला- महिला टीम स्प्रिंट पात्रता (दुपारी २.३० वा.)
रोजित, रोनाल्डो, डेविड, एसो- पुरुष टीम स्प्रिंट पात्रता (दुपारी २.३० वा.)

पुरुष टीम परसुईट फायनल (पात्र झाल्यास) (रात्री ८.३० वा.)
महिला टीम स्प्रिंट फायनल (पात्र झाल्यास) (रात्री ८.३० वा.)
पुरुष टीम स्प्रिंट फायनल (पात्र झाल्यास) (रात्री ८.३० वा.)

ट्रायथलॉन

आदर्श, विश्वनाथ - पुरुष फायनल (दुपारी ३.३० वा.)
संजना, प्रज्ञा- महिला फायनल (संध्याकाळी ५.३० वा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी