Commonwealth Games 2022: भारताला दुसरं गोल्ड मेडल, Jeremy Lalrinnunga ने Weightlifting मध्ये पटकावलं Gold

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये तिसऱ्या दिवशी भारताच्या जेरेमी लालरिननुंगा याने गोल्ड मेडल पटकावलं आहे. 

Commonwealth Games 2022 indian weighlifter Jeremy lalrinnunga wins gold medal in mens weightlifting this is second gold
भारताच्या Jeremy Lalrinnunga ने Weightlifting मध्ये पटकावलं Gold (Photo: @Media_SAI) 
थोडं पण कामाचं
  • कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारताला दुसरं गोल्ड मेडल
  • भारताच्या जेरेमी लालरिननुंगा याने गोल्ड मेडल पटकावलं

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये तिसऱ्या दिवशी भारताच्या जेरेमी लालरिननुंगा याने गोल्ड मेडल पटकावलं आहे. १९ वर्षीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिननुंगा याने कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये हे भारताला मिळालेलं दुसरे गोल्ड मेडल आहे. जेरेमी लालरिननुंगा याने पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावले आहे. (Commonwealth Games 2022 indian weightlifter Jeremy lalrinnunga wins gold medal in mens weightlifting this is second gold)

२०१८ च्या युवा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या जेरेमी लालरिननुंगाने स्नॅचमध्ये विक्रमी १४० किलोग्रॅम वजन उचलले तर त्याने क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचलले. म्हणजेच जेरेमीने एकूण ३०० किलो वजन उचलले. जे दुसऱ्या क्रमांकाच्या समोआ या प्रतिस्पर्ध्यापेक्षा ७ किलोहून अधिक होते.

भारताला एकूण ५ मेडल

वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आतापर्यंत एकूण ५ मेडल्स मिळाले आहेत. मीराबाई चानूने गोल्ड मेडल, संकेत सरगर आणि बिंदियाराणी यांनी सिल्वर मेडल तर गुरुराजाने ब्रॉन्ज मेडल पटकावलं आहे.

जेरेमीने स्नॅच राऊंडमध्ये केला विक्रम

स्रॅच राऊंडमद्ये मिझोरामच्या जेरेमी लालरिननुंगा याने अवघ्या एका लिफ्टमध्ये अशी कामगिरी केली की त्यामुळे गोल्ड मेडलच्या रेसमध्ये तो आघाडीवर गेला. जेरेमीने पहिल्याच प्रयत्नात १३६ किलो वजन उचलले तर दुसऱ्या प्रयत्नात त्याने १४० किलो वजन उचलले. हा एक विक्रमच आहे. जेरेमीने स्नॅचच्या शेवटच्या प्रयत्नात १४३ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही. मात्र, असे असले तरीही तो प्रतिस्पर्ध्यापेक्षा १० किलो वजनासह पुढे होता आणि त्याने गोल्ड मेडल मिळवलं आहे. जेरमी लालरिनुंगा याने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे.

सामोआच्या वैपावा नेवो याने २९३ किलो वजन उचलून या स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावले आहेत. त्याने क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये १६६ किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये त्याने १२७ किलो वजन उचलले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी