Commonwealth Games 2022 : सौरव घोषालचा दणदणीत विजय, भारताला स्क्वॉशमध्ये कांस्यपदक

भारताचा स्क्वॉशपटू (Indian squash player) सौरव घोषालने (Sourav Ghoshal) धडाकेबाज कामगिरी करत भारताला अजून एक पदक जिंकवून दिले. पुरुषांच्या सामन्यात सौरवने इंग्लंडच्या (England) जेम्स विल्स्ट्रॉपवर (James Willstrop) दणदणीत विजय साकारला आणि भारताला कांस्यपदक पटकावून दिले. सौरभने महिला आणि पुरुष एकत्र गटात राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) भारतासाठी पहिले पदक जिंकले. सौरवने जेम्स विल्स्ट्रॉपचा 3-0 असा पराभव केला.

Saurav Ghoshal won bronze medal in squash
सौरव घोषालनं स्क्वॉशमध्ये मिळवलं कांस्यपदक   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषालने धडाकेबाज कामगिरी करत कांस्यपदक मिळवलं.
  • घोषालला उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या पॉल कॉलकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
  • पुरुषांच्या सामन्यात सौरवने इंग्लंडच्या जेम्स विल्स्ट्रॉपवर दणदणीत विजय साकारला

Commonwealth Games 2022 : बर्मिंगहम : भारताचा स्क्वॉशपटू (Indian squash player) सौरव घोषालने (Sourav Ghoshal) धडाकेबाज कामगिरी करत भारताला अजून एक पदक जिंकवून दिले. पुरुषांच्या सामन्यात सौरवने इंग्लंडच्या (England) जेम्स विल्स्ट्रॉपवर (James Willstrop) दणदणीत विजय साकारला आणि भारताला कांस्यपदक पटकावून दिले. सौरभने महिला आणि पुरुष एकत्र गटात राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) भारतासाठी पहिले पदक जिंकले. सौरवने जेम्स विल्स्ट्रॉपचा 3-0 असा पराभव केला. पहिला गेम त्याने 11-6 असा जिंकला आणि दुसरा गेमही 11-1 ने जिंकला. तिसऱ्या गेममध्ये सौरवने विल्स्ट्रॉपचा 11-4 असा पराभव केला.

भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषाल कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लंडच्या जेम्स विल्स्ट्रॉपविरुद्ध खेळायला उतरला होता. या सामन्याची सुरुवात चांगलीच आक्रमक झाली. दोन्ही खेळाडू या सामन्यात आक्रमक पद्धतीने खेळत होता. सौरव घोषालने शेवटचा सामना त्याच दृष्टिकोनाने खेळला होता, पण त्यावेळी तो कमी पडला होता. पण आजही त्याने आक्रमकपणा कायम ठेवला आणि पहिल्या गेममध्ये ४-२ ने आघाडी घेतली होती.

पंचाच्या निर्णयावर सौरव घोषाल फारसा खूश नाही कारण त्याला वाटले की विल्स्ट्रॉपने त्याला धक्का दिला ज्यामुळे त्याला पुढे जाणे आणि शॉट मारण्यासाठी थांबवले. मात्र तरीही तो पहिल्या गेममध्ये १०-०६ अशी आघाडी कायम ठेवली होती. पहिला गेम ११-६ असा जिंकून सौरव घोषालने वर्चस्व गाजवले.

Read Also : संजय राऊतांना जामीन मिळणार? आज पुन्हा कोर्टात सुनावणी

दुसऱ्या गेममध्ये सौरव घोषालचे पूर्ण वर्चस्व पाहायला मिळाले. इंग्लिश खेळाडूला आतापर्यंत त्याच्याशी सामना करता नाही. घोषालने दुसऱ्या गेममध्ये ८-१ अशी दमदार आघाडी घेतली होती. जर घोषालने आघाडी कायम ठेवली तर त्याला कांस्यपदकावर आपले नाव कोरता येऊ शकते. दुसरा गेमही त्याने ११-१ असा जिंकला आणि सामन्यात २-० अशी दमदार आघाडी घेतली. तिसऱ्या गेममध्येही त्याने आपला धडाका कायम ठेवला आणि पदक जिंकले.

Read Also : ५ ते १५ ऑगस्ट सर्व ऐतिहासिक स्मारकस्थळी विनामूल्य प्रवेश

यापूर्वी घोषालला उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या पॉल कॉलकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण यापूर्वी त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली होती. गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले होते. २०१३ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा सौरव पहिला भारतीय ठरला होता. त्यानंतर सौरवने एकामागून एक आंतरराष्ट्रीय स्तरावर जेतेपदे पटकावली होती आणि या खेळात आपली जगात ओळख निर्माण केली होती. पण या स्पर्धेत मात्र त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी