Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : बर्मिंगहॅम : येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games ) भारतीय खेळाडूं (Indian players) सातत्यानं दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. कॉमनवेल्थ लॉन्ग जंप (Long Jump ) इव्हेंटच्या अंतिम सामन्यात भारताचा लांब उडीपटू (long jumper) एम श्रीशंकरनं (Murli Shreeshankar) रौप्यपदक (silver medal) जिंकून बर्मिंगहॅममध्ये तिरंगा फडकावला. मुरली श्रीशंकरनं ८.०८ मीटर उडी मारली आणि भारताच्या झोळीत आणखी एक पदक पडलं. आतापर्यंत भारतानं कॉमनवेल्थ स्पर्धेत आतापर्यंत २० पदकं जिंकली आहेत.
केरळमधील पलक्कड येथील २३ वर्षीय एम श्रीशंकरने लांब उडीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला पुरुष भारतीय खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत श्रीशंकर हा सहावा होता. पण फक्त एकाच दमदार उडीच्या जोरावर त्याने दुसरा क्रमांक गाठला आणि रौप्यपदकाला गवसणी घातली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडीत भारताच्या दोन महिलांनी पदक जिंकले होते, पण पुरुषांमध्ये पदक जिंकणारा श्रीशंकर हा पहिलाच भारतीय ठरला.
Read Also : हा अभिनेता होणार शक्तिमान
यापूर्वी महिला माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज आणि प्रज्यूषा यांनी देशासाठी पदकं जिंकली आहेत. अंजू बॉबीनं 2002 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्य आणि 2010 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत प्रज्यूषानं रौप्यपदक जिंकलं होतं. लांब उडीत प्रज्युषा पहिलं रौप्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर आज मुरली श्रीशंकनं रौप्यपदक पटकावलंय. लांब उडीच्या फायनलमध्ये मुरली श्रीशंकर व मुहम्मद अनीस याहिया यांनी दमदार कामगिरी केली. पण यामध्ये श्रीशंकरला पदक मिळवण्यात यश आले. पण हे यश श्रीशंकरला खडतर संघर्षानंतर मिळाले आहे. कारण श्रीशंकरची चौथ्या प्रयत्नात ८ मीटरची लांब उडी अवैध ठरवण्यात आली.
Read Also : न्यायमूर्ती उदय ललित होणार भारताचे 49 वे सरन्यायाधीश
श्रीशंकरने ८ मीटरपेक्षा अधिक लांब उडी मारली होती, पण लँडींग बोर्डवर १ सेंटीमीटरच्या फरकाने त्याचा हा प्रयत्न वैध नसल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे श्रीशंकरचा हा प्रयत्न फाऊल ठरवला गेला. श्रीशंकर त्यावेळी थोडासा निराश झाला, पण त्याने हार मानली नाही. पाचव्या प्रयत्यामध्ये त्याने ही कसर भरून काढली. या स्पर्धेत श्रीशंकर ८.३६ मीटर या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसह सुवर्णपदकाच्या प्रबळ दावेदारात आघाडीवर होता. पण त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाचव्या प्रयत्नात लांब उडी मारून सहाव्या क्रमांकावरून त्याने थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.