Dutee Chand Story : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्ससाठी (Commonwealth games 2022) जगभरातील खेळाडूंप्रमाणे भारतीय खेळाडूंनीही (Indian players) कंबर कसली असून अधिकाधिक मेडल्स जिंकण्यासाठी जोरदार सराव सुरु केला आहे. भारताचे जवळपास 300 ॲथलिट्स या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यापैकीच एक आहे धावपटू दूती चंद. दूती (Dutee Chand) ऑलिम्पिकमध्ये 4x100 रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. 6 ऑगस्ट या दिवशी दूती ऑलिम्पिकसाठी धावताना दिसेल. त्यासाठी ती सध्या कसून सराव करते आहे आणि भारताला मेडल मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावण्याच्या तयारीत आहे. दूतीचा आजवरचा प्रवास हा अनेक आव्हानं आणि अडथळ्यांनी भरलेला होता. अगोदर पुरुष असल्याचा आरोप आणि नंतर लेस्बियन असल्याचं जाहीर केल्यावर समाजाने घातलेला बहिष्कार यासारख्या संकटांचा सामना तिने केला आणि आजही तितक्याच खंबीरपणे ती मैदानात उतरली आहे.
दूतीचं कुटुंब अत्यंत गरीब. नऊ जणांच्या कुटुंबाचा हिस्सा असलेल्या दूतीनं लहानपणापासूनच धावायला सुरुवात केली. गावात नदीकिनाऱ्याहून जाणाऱ्या पायवाटेनं धावण्याचा छंद तिला जडला होता. हीच वाट आपली गरीबी संपवेल, याची तिला आशा होती.
2014 साली आशियायी स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळालं होतं. मात्र त्यावेळी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने तिच्यावर पुरुष असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आयत्या वेळी तिला कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी व्हायला मनाई करण्यात आली होती. या गोष्टीला शास्त्रीय भाषेत हायपरअँड्रोजेनिज्म असं म्हणतात. मात्र दूतीनं हार न मानता कोर्टात धाव घेतली. कोर्टात लढा देऊन तिने विजय मिळवला आणि आपल्यावरचा हा आरोप खोटा सिद्ध केला.
ॲथलेटिक्स फेडरेशनवर या कारणावरून क्रीडा विश्वात जोरदार टीकाही झाली होती. कोर्टाची लढाई जिंकल्यानंतर कमबॅक केलेल्या दूतीनं नवी दिल्ली फेडरेशन कपमध्ये सहभाग घेतला. 2016 साली झालेल्या या स्पर्धेत तिनं राष्ट्रीय रेकॉर्ड केलं.
अधिक वाचा - Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत असा आहे भारताचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम
2017 साली दूतीच्या आयुष्यात एक तरुणी आली. आपण तिला आपले अनुभव सांगितले आणि आपला लढा कसा होता, याची माहिती दिली. तिनं ज्या पद्धतीनं ते समजून घेतलं ते पाहून हीच माझ्या आयुष्याची जोडीदार होऊ शकते, असा निर्णय तिने जाहीर केला. आपण लेस्बियन असल्याचं तिने जाहीर केल्यानंतर मात्र तिचे समर्थकही विरोधक झाले. गावातील अनेकांनी तिच्यावर बहिष्कार घातला. अनेक नातेवाईकांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले. मात्र खचून न जाता तिने आपलं पूर्ण लक्ष आपल्या खेळावरच केंद्रीत केलं.
अधिक वाचा - VIDEO: कार्तिकचे नाव घेऊन चिडवत होता प्रेक्षक, मुरली विजयने स्टँडमध्ये घुसून केली मारहाण
ऑलिम्पिक कोटा मिळण्याच्या एक दिवस अगोदर तिला ओडिशा सरकारनं खूशखबर दिली. राजीव गांधी खेलरत्न या देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी तिचं नामांकन करण्यात आलं आहे. आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये दूती कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.