भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याने आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करत कुस्तीमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारतासाठी हे राष्ट्रकुल स्पर्धेतील एकूण सहावे सुवर्णपदक आहे. बजरंगने 65 किलो वजनी गटात अंतिम फेरीत कॅनडाच्या लचलान मॅकगिलचा 9-2 असा पराभव केला. अंशू मलिकच्या रौप्यपदकानंतर बजरंगकडून सोन्याची अपेक्षा होती आणि त्याने ती पूर्ण केली आहे.
भारतासाठी बजरंग पुनियाने सलग दुसऱ्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर कब्जा केला आहे. याआधीही बजरंगने 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. एवढेच नाही तर बजरंगने ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धांमध्येही पदके जिंकली आहेत. कुस्तीतील पहिल्या सुवर्णासह भारताच्या खात्यात आता एकूण ६ सुवर्णपदके झाली आहेत.