बर्मिंगहम : भारताच्या खेळाडूने आज वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) अजून एक पदक पटकावलं आहे. भारताच्या गुरदीप सिंगने (Gurdeep Singh) १०९ किलो वरील गटात एकूण ३९० किलो वजन उचलले आणि कांस्यपदक (Bronze medal) पटकावले. गुरदीप सिंगकडून धडाकेबाज कामगिरी केली, कारण त्याने पहिल्याच प्रयत्नात २०७ किलो क्लीन अँड जर्क उचलले आणि तो या स्पर्धेत अव्वल स्थानावर पोहोचला. गुरदीप सिंगने दुसऱ्या प्रयत्नात पाच किलो वाढ करून २१५ किलो क्लीन अँड जर्क उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. भारतीय वेटलिफ्टरने येथे क्लीन अँड जर्क फेरीत सनसनाटी कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. त्याने १०९ किलो वरील गटात एकूण ३९० किलो वजन उचलले आणि तिसरा क्रमांक पटकावला.
पंजाबमधील खन्नाजवळील माजरी रसुलरा गावातील २६ वर्षीय शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या गुरदीप सिंगने पोडियम फिनिशसाठी ३९०kg (१६७kg+ २२३kg) साठी सर्वोत्तम प्रयत्न केले आणि हेवीवेट प्रकारात भारताला पहिले पदक मिळाले. आपल्या २२३ किलो क्लीन अँड जर्कच्या प्रयत्नाने सिंगने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आणि स्वतःचा राष्ट्रीय विक्रमही लिहिला आहे.
Read Also : टीईटी परीक्षा घोटाळा; ७ हजार उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी
विशेष म्हणजे हाताला दुखापत असतानाही आव्हान स्विकारलं. "मला मनगटाची दुखापत झाली होती त्यामुळे स्नॅचमध्ये माझा सर्वोत्तम खेळ करू शकलो नाही अन्यथा मला रौप्यपदक मिळाले असते," असे सात वेळा राष्ट्रीय चॅम्पियनने सांगितले. पाकिस्तानच्या मुहम्मद नूह बटने ४०५ किलो विक्रमी लिफ्टसाठी सुवर्णपदक जिंकले. तर न्यूझीलंडच्या डेव्हिड अँड्र्यू लिटीने ३९४ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.
Read Also : संजय राऊतांना जामीन मिळणार? आज पुन्हा कोर्टात सुनावणी
सिंगने 167 किलो वजनाचा पहिला स्नॅच प्रयत्न फडकवल्यामुळे त्याची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या प्रयत्नात तो वजन उचलण्यात यशस्वी झाला. मात्र १७३ किलो वजनाच्या तिसऱ्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. याआधी वेटलिफ्टिंगमध्ये लवप्रीतने कॉमनवेल्थचे १०९ किग्रॅ. प्रकारात भाग घेऊन कांस्यपदक पटकावले. बुधवारी (३ ऑगस्ट) झालेल्या पदक लढतीत लवप्रीतने एकूण ३५५ किलो वजन उचलले. लवप्रीतने कॉमनवेल्थचे 109 किग्रॅ. प्रकारात भाग घेऊन कांस्यपदक पटकावले. बुधवारी (३ ऑगस्ट) झालेल्या पदक लढतीत लवप्रीतने एकूण ३५५ किलो वजन उचलले.