Dhoni Vs Gambhir: KKRच्या एका फोटोने घातला गोंधळ, ट्विटरवर गंभीर-धोनीच्या चाहत्यांमध्ये जुंपली

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 10, 2022 | 15:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dhoni Vs Gambhir:आयपीएलची कोलकाता नाईट रायडर्स टीमे अॅशेसच्या धर्तीवर सामन्याचा एक फोटो पोस्ट केला. यात धोनीच्या आजूबाजूला प्लेयर्स दिसत आहेत. केकेआरने हा कर्णधार गंभीरचा मास्टरस्ट्रोक असल्याचे म्हटले आहे. 

dhoni vs gambhir
KKRच्या या फोटोने गोंधळ, गंभीर-धोनीच्या चाहत्यांमध्ये जुंपली 
थोडं पण कामाचं
  • अॅशेसमधील रोमांचक सामन्याने भारतात वाद
  • केकेआरने शेअर केला जुना फोटो

मुंबई : अ२शेस कसोटी(ashes series) मालिकेच्या चौथ्या सामन्यात रविवारी रोमांचक लढाई पाहायला मिळाली. इंग्लंडने(england) शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाही आणि सामन्यात पराभूत होण्यापासून स्वत:ला वाचवले. या दरम्यान एक फोटो समोर आला आहे जो क्रिकेट वर्ल्डमध्ये व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाने(australia) शेवटचा विकेट मिळवण्यासाठी सर्व फिल्डर्सना फलंदाजांच्या आजूबाजूला उभे केले आहे. controversy between ms dhoni and gautam gambhir fans on social media

क्रिकेट चाहत्यांना हे जबरदस्त वाटले. मात्र या फोटोच्या चक्करमध्ये आता भारतात सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमने अॅशेसच्या धर्तीवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात धोनीच्या आजूबाजूला सारे फिल्डर्स आहेत. केकेआरने आता कर्णधार गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक सांगितला आहे. या फोटोवरून वाद सुरू झाला आहे. गौतम गंभीरचे चाहते आणि धोनीच्या चाहत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. 

हा फोटो २०१६चा आहे जेव्हा कोलकाता नाईट रायडर्स आणि पुणे सुपरजायटंस् यांच्यात सामना सुरू होता. अखेरच्या ओव्हर्समध्ये एमएस धोनीवर दबाव टाकण्यासाठी गौतम गंभीरने अशा प्रकारची फिल्डिंग केली होती. हा सामना केकेआरने जिंकला होता. मात्र कालच्या प्रसंगानंतर हा फोटो पुन्हा चर्चेत आहे. चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू रवींद्र जडेजानेही कोलकात्याच्या या फोटोवर रिप्लाय दिला आणि म्हटले की हा काही मास्टरस्ट्रोक नाही तर एक शो ऑफ आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्सच्या अनेक चाहत्यांना ही बाब खटकली आणि फोटो पोस्ट केल्याबाबत त्यांनी कोलकाताना 
नाईट रायडर्सवर टीका केली. 

एमकदा गौतम गंभीर आणि धोनीच्या चाहत्यांमध्ये अशा प्रकारचे वाद सुरू असतात. त्यामागचे कारण म्हणजे गौतम गंभीर अनेकदा धोनीविरुद्ध विधान करत असतो. मग ते वर्ल्डकप २०११च्या विजयाचे क्रेडिट मिळण्याबाबत असो अथवा २०१२च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील संघ निवडीची बाब असो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी