Ashes Series Aus vs Eng: बेन स्टोक्सच्या नोबॉलवरून गोंधळ, माजी क्रिकेटरची टीका

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 09, 2021 | 13:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

सामना सुरू होण्याआधी टीव्ही अंपायरसाठी प्रत्येक बॉल चेक करण्याची जी सिस्टीम असते त्यात तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळे या सामन्यासाठी जुनी तांत्रिक पद्धत वापरली जात होत.

ben stokes
Ashes Series Aus vs Eng: बेन स्टोक्सच्या नोबॉलवरून गोंधळ 
थोडं पण कामाचं
  • स्टोक्सने आपल्या पहिल्याच ओव्हरमधील चौथ्या बॉलवर डेविड वॉर्नरला(david warner) क्लीन बोल्ड केले होते.
  • मात्र टीव्ही रिप्लेमध्ये समोर आले की हा नोबॉल होता.
  • वॉर्नरला अशा पद्धतीने १७ धावांवर जीवनदान मिळाले.

मुंबई: ऑस्ट्रेलिया(australia) आणि इंग्लंड(england) यांच्यात अॅशेस मालिकेतील(ashes series) पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सची(ben stokes) पहिली ओव्हर चांगलीच वादग्रस्त ठरली. स्टोक्सने आपल्या पहिल्याच ओव्हरमधील चौथ्या बॉलवर डेविड वॉर्नरला(david warner) क्लीन बोल्ड केले होते. मात्र टीव्ही रिप्लेमध्ये समोर आले की हा नोबॉल होता. वॉर्नरला अशा पद्धतीने १७ धावांवर जीवनदान मिळाले. मात्र वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा रिप्लेमध्ये पाहिले की स्टोक्सच्य्या त्या ओव्हरमधील पहिले चार बॉलही नोबॉल होते. मात्र अंपायरने त्याच बॉलला नोबॉल दिले ज्यावर वॉर्नर बोल्ड झाला होता. आयसीसीच्या नियमानुसार टीव्ही अंपायरला बॉल नो बॉल आहे की नाही असे प्रत्येक बॉलवर लक्ष ठेवायचे असते. यासाठी नव्या तंत्राचाही वापर केला जातो. controversy in Australia vs England match because of ben stokes no ball

ईएसपीएनक्रिकइन्फोनुसार या मालिकेचे होस्ट ब्रॉडकास्टर चॅनेल सेवेनला याला दुजोरा दिली की सामना सुरू होण्याआधी टीव्ही अंपायरसाठी प्रत्येक बॉल चेक करण्याची जी सिस्टीम असते त्यात तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळे या सामन्यासाठी जुनी तांत्रिक पद्धत वापरली जात होत. या जुन्या पद्धतीनुसार टीव्ही अंपायर तेच बॉल चेक करतो ज्यावर विकेट पडली आहे. २०१९मध्ये आयसीसीने पहिल्यांदा नव्या पद्धतीची चाचणी केली होती. यानुसार प्रत्येक बॉल नो बॉल आहे की नाही हे चेक केले जाईल. यानंतर २०२०मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेदरम्यान पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये हा नियम लागू करण्यात आला होता. 

यावरून आता वाद सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग आणि माजी अंपायर सायमन टफेल यांनी यावर जोरदार टीका केली आहे. सामन्याबाबत बोलायचे झाल्यास इंग्लंडने ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र अवघा संघ केवळ १४७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यजमान ऑस्ट्रेलियाचीही सुरूवात खराब राहिली. ११ धावांवरर मार्क्स हॅरिस बाद झाला. मात्र मार्नस लाबुशेन आणि डेविड वॉर्नर यांनी मिळून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी