IPl 2022मध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली कॅपिटल्सचा हा सदस्य पॉझिटिव्ह

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 15, 2022 | 19:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPl 2022मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

delhi capitals
IPl मध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य पॉझिटिव्ह 
थोडं पण कामाचं
  • दिल्ली कॅपिटल्सचे कोच ट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह
  • गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोना आयपीएलमध्ये बायो-बबल भेदण्यात यशस्वी 
  • भारतात पुन्हा वाढू लागल्या कोरोनाच्या केसेस

मुंबई: भारतात कोरोनाच्या(corona) वाढत्या केसेस पाहता आयपीएल २०२२च्या(ipl 2022) बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या(delhi capitals) संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओ फरहार्ट यांच्याबाबतच्या विधानात म्हटले की दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिल्ली कॅपिटल्सची मेडिकल टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. corona enter in ipl 2022, delhi capitals member found positive

अधिक वाचा - आलिया भट्ट आणि कंगनाची साडी सेम-सेम?

कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसताना आयपीएलमध्येही कोरोनाचा धोका वाढला आहे. गेल्या हंगामातही एप्रिल मेमध्ये कोरोना प्रकरणे वाढल्यानंतर आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. यानंतर दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यूएईमध्ये करण्यात आले होते. 

बीसीसीआयने यावेळेस कोरोनाचा मुद्दा लक्षात घेता आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन मुंबई आणि पुण्यात करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेत असलेल्या सर्व १० टीम्स दोन शहरांच्या चार मैदानांवर सामने खेळत आहेत. यात मुंबईचे वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियमवर आणि पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडियमचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी