Virat Kohli: पत्नीला निर्वाह भत्ता देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पतीला कोर्टाने फटकारले, विराट कोहलीचे नाव घेत दिले आदेश

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 11, 2022 | 16:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

court slams hhusband: अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनुज अग्रवाल खालच्या कोर्टातील त्या आदेशाविरोधात एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी देत होते. यात सांगितले होते की वेगळ्या राहत असलेल्या पत्नीला ३० हजार रूपये निर्वाह भत्ता दिला जावा. 

virat kohli
virat : विराट कोहलीचे नाव घेत कोर्टाने पतीला दिले हे आदेश 
थोडं पण कामाचं
  • अनुज अग्रवाल यांनी खालच्या कोर्टातील त्या आदेशाविरोधात एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी केली
  • यात याचिका करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पत्नीला ३० हजार रूपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले होते.
  • या निर्णयास त्या व्यक्तीने वरच्या न्यायालयात आव्हान दिले होते.तसेच आपल्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसल्याचे याचिकेत म्हटले होते. 

मुंबई: दिल्लीच्या(delhi court) एका कोर्टाने आपल्या एका सुनावणीदरम्यान एका व्यक्तीला आपल्या पत्नीला निर्वाह भत्ता(interim maintenanc) देण्याचे आदेश दिले कारण ती व्यक्ती ज्या कंपनीत डायरेक्टर पदावर कार्यरत आहे त्याचा ब्राँड अॅम्बेसिडेर विराट कोहली(virat kohli) आहे. यावरून हे दिसते की ही व्यक्ती म्हणजेच याचिका करणारी व्यक्ती सधन आहे. त्या व्यक्तीने हा भत्ता देण्यास सक्षम नसल्याचे म्हटले होते मात्र कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली. court slams husband who not able to give interim maintenanc to his estranged wife 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनुज अग्रवाल यांनी खालच्या कोर्टातील त्या आदेशाविरोधात एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी केली. यात याचिका करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पत्नीला ३० हजार रूपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले होते. मात्र या निर्णयास त्या व्यक्तीने वरच्या न्यायालयात आव्हान दिले होते.तसेच आपल्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसल्याचे याचिकेत म्हटले होते. 

कोर्टाला केसदरम्यान आढळले की ज्या कंपनीत याचिका करणारी व्यक्ती डायरेक्टर पदावर होती त्याचा ब्रँड अॅम्बेसिडेर विराट कोहली आहे. न्यायाधीश अनुज अग्रवाल म्हणाले, कोर्ट यया तथ्याची न्यायालयीन नोटीस आणू शकते की त्या वेळेस ब्राँड अॅम्बेसिडेर विराट कोहली आहे जो सध्या भारतीय संघाचा कर्णधार आहे. दरम्यान, हे अशक्य आहे की एक कंपनी जी तोट्यात आहे(जसा याचिका करणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे) ती या स्थितीत अशा सेलिब्रेटीला आपल्या उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी आणू शकते. 

याचिका करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीच्या वकिलांनी त्या उत्पादनाचे रॅपर कोर्टात सादर केले होते. कोर्टाला आढळले की त्या व्यक्तीचा मोठा बिझनेस आहे. मात्र तो वेगळ्या राहत असलेल्या पत्नीला निर्वाह भत्ता न देण्यासाठी स्वत:ला कंगाल म्हणत आहे. पत्नी त्या व्यक्तीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावत म्हटले की ती वेगळी राहत आहे आणि तिच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नाही. 

कोर्टाला आढळले होते की पतीची मासिक कमाई १ लाख रूपये आहे. पतीचे म्हणणे होते की महिलेने त्याच्या व्यवसायातून खूप पैसे कमावले आहेत तसेच ती शिक्षितही आहे. तर दुसरीकडे महिलेचे म्हणणे होते की तिच्या पतीची मासिक कमाई लाखोंच्या घरात आहे. महिलेने हा आरोपही केला की स्वत:ला कंगाल सिद्ध करण्यासाठी तिच्या पतीने गैरव्यवहार केला.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी