प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होणार टोकियो ऑलिंपिक

COVID-19: Tokyo Olympics to be held without spectators वाढत्या कोरोना संकटामुळे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत टोकियो ऑलिंपिकचे आयोजन करण्याचा निर्णय झाला आहे.

COVID-19: Tokyo Olympics to be held without spectators
प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होणार टोकियो ऑलिंपिक 

थोडं पण कामाचं

  • प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होणार टोकियो ऑलिंपिक
  • जपानची राजधानी टोकियो येथे आरोग्य आणीबाणी
  • आणीबाणी २२ जुलै २०२१ पर्यंत लागू

टोकियो: वाढत्या कोरोना संकटामुळे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत टोकियो ऑलिंपिकचे आयोजन करण्याचा निर्णय झाला आहे. जपानची राजधानी टोकियो येथे आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ही आणीबाणी २२ जुलै २०२१ पर्यंत लागू राहणार आहे. ही माहिती जपानचे ऑलिंपिक मंत्री तामायो मारूकावा यांनी दिली. COVID-19: Tokyo Olympics to be held without spectators

ऑलिंपिक बघण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. ऑलिंपिक ज्योत जपानमध्ये दाखल झाली आहे. मात्र ऑलिंपिक ज्योत स्टेडियममध्ये आणण्याआधी होणाऱ्या कार्यक्रमातही प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. मर्यादीत व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल.

टोकियो ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळा २३ जुलै २०२१ रोजी आहे. तसेच समारोपाचा कार्यक्रम ८ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठीही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. जगभरातील प्रेक्षक टीव्हीवर तसेच व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून ऑलिंपिक बघू शकतील.

आरोग्य आणीबाणी सुरू असल्यामुळे बार, रेस्टॉरंट आणि कराओके पार्लर्स २२ जुलै २०२१ पर्यंत बंद असतील. ऑलिंपिक सुरू असतानाच्या काळात बार, रेस्टॉरंट आणि कराओके पार्लर्स सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन आणीबाणी संपण्याआधी जाहीर केला जाईल. बुधवारी टोकियोमध्ये ९२० नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच गुरुवारी टोकियोमध्ये ८९६ नवे कोरोना रुग्ण आढळले. 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे (International Olympic Committee - IOC) अध्यक्ष थॉमस बाख टोकियोमधील ऑलिंपिकच्या तयारीची तसेच कोरोना स्थितीची माहिती घेणार आहेत. यामुळे पुढच्या आठवड्यात ऑलिंपिक संदर्भात महत्तवाच्या घोषणांची शक्यता आहे.

टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय खेळाडूंचे पहिले पथक १७ जुलै २०२१ रोजी रवाना होईल. यंदाच्या ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणित यांना जोरदार सलामी देण्याची संधी आहे. महिला एकेरीत सिंधू पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या चेंग यी आणि इस्त्रायलच्या सेनिया पोलिकार्पोव्हा या दोघींविरोधात प्रत्येकी एक मॅच खेळेल. साईप्रणितच्या गटात मार्क कॅलिजो आणि मिशा झिबरेमन यांचा समावेश आहे. यामुळे सलामीच्या लढती भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी सोप्या आहेत. पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी यांना मात्र अग्रमानांकित केव्हिन सुकामुल्जो आणि मार्कस गिडेओन यांच्या विरोधात मैदानात उतरायचे आहे. दुसऱ्या लढतीत त्यांच्यासमोर ली यांग आणि वांग ची लिन यांचे आव्हान असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी