टोकियो ऑलिम्पिक: ऑलिम्पिक गावात ५५ जणांना कोरोना

COVID scare at Tokyo Olympics, Found 55 Covid19 Positive Cases जपानची राजधानी टोकियो येथे शुक्रवार २३ जुलै २०२१ पासून ऑलिम्पिक सुरू होत आहे. पण ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच ५५ जणांना कोरोनाची बाधा झाली.

COVID scare at Tokyo Olympics, Found 55 Covid19 Positive Cases
टोकियो ऑलिम्पिक: ऑलिम्पिक गावात ५५ जणांना कोरोना 

थोडं पण कामाचं

  • टोकियो ऑलिम्पिक: ऑलिम्पिक गावात ५५ जणांना कोरोना
  • कोरोनाबाधीत आणि त्यांच्या संपर्कात आलेले अशा सर्वांवर मेडिकल टीमचे लक्ष
  • ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले चार खेळाडू कोरोनाबाधीत

टोकियो: जपानची राजधानी टोकियो येथे शुक्रवार २३ जुलै २०२१ पासून ऑलिम्पिक सुरू होत आहे. पण ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच ५५ जणांना कोरोनाची बाधा झाली. ज्यांना कोरोनाची बाधा झाली त्यांच्यापैकी एकजण ऑलिम्पिक गावाबाहेर आणि इतर सर्वजण ऑलिम्पिक गावामध्ये क्वारंटाइन आहेत. तसेच त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोनाबाधीत आणि त्यांच्या संपर्कात आलेले अशा सर्वांवर मेडिकल टीमचे लक्ष आहे. कोरोना रुग्णांचे उपचार सुरू आहेत. COVID scare at Tokyo Olympics, Found 55 Covid19 Positive Cases

आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले चार खेळाडू, खेळांशी संबंधित असलेल्या १६ व्यक्ती, चार प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दोन टोकियो ऑलिम्पिकशी संबंधित कर्मचारी, २९ ऑलिम्पिकशी संबंधित कंत्राटी व्यक्ती अशा ५५ जणांना कोरोना झाला आहे.

कोरोना असल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशबंदी आहे. तसेच विजेत्या खेळाडूंना त्यांचे मेडल स्वतःच्या हाताने गळ्यात घालून घ्यावे लागणार आहे. कोरोनामुळे ऑलिम्पिकच्या निवडक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक वस्तूचे निर्जंतुकीकरण केल्यानंतरच ती वापरण्याची काळजी घेतली जात आहे. संपूर्ण टोकियोत आरोग्य आणीबाणी सुरू असून कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे. एवढी खबरदारी घेतली जात असली तरी कळत नकळतपणे संसर्ग झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच ५५ जणांना कोरोना झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी