Hotstar किंवा Amazon Prime वर नाही मग कुठे दिसणार INDvsBAN ODI सीरिज?

cricket india vs bangladesh odi and test series live streaming when and where to watch live telecast : भारत आणि बांगलादेश यांच्यात बांगलादेशमध्ये रविवार 4 डिसेंबर 2022 पासून 3 वन डे मॅचची सीरिज सुरू होत आहे. यानंतर 2 टेस्ट मॅचची सीरिज पण होणार आहे.

cricket india vs bangladesh odi and test series live streaming when and where to watch live telecast
कुठे दिसणार INDvsBAN ODI सीरिज?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Hotstar किंवा Amazon Prime वर नाही मग कुठे दिसणार INDvsBAN ODI सीरिज?
  • वन डे सीरिजसाठी टीम इंडिया
  • भारताचा बांगलादेश दौरा - कार्यक्रम

cricket india vs bangladesh odi and test series live streaming when and where to watch live telecast : भारत आणि बांगलादेश यांच्यात बांगलादेशमध्ये रविवार 4 डिसेंबर 2022 पासून 3 वन डे मॅचची सीरिज सुरू होत आहे. यानंतर 2 टेस्ट मॅचची सीरिज पण होणार आहे. या 5 मॅच बांगलादेशमध्ये होतील. बांगलादेशची राजधानी ढाका येथे 2 वन डे आणि 1 टेस्ट होणार आहे. चटोग्राम येथे 1 वन डे आणि 1 टेस्ट होणार आहे.

भारताशी संबंधित बहुसंख्य इंटरनॅशनल क्रिकेट मॅच हॉटस्टारवर (Hotstar) बघता येतात. अलिकडे झालेली भारत वि. न्यूझीलंड ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) दिसली. पण भारताच्या बांगलादेश दौऱ्यातील सर्व मॅच हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर दिसणार नाहीत. या 5 मॅच सोनी लिव्ह (Sony LIV) या अॅपवर बघता येतील. टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर मॅचचे थेट प्रक्षेपण होईल. 

बांगलादेश दौऱ्यावर जात असलेल्या टीममध्ये कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल पुन्हा खेळताना दिसतील. या 3 खेळाडूंना आराम देण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यातून वगळण्यात आले होते. पण मोहम्मद शमी हा वेगवान गोलंदाज बांगलादेश दौऱ्यावर जाणार नसल्याचे वृत्त आहे. त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे समजते. पण बीसीसीआयकडून अद्याप शमी संदर्भात अधिकृत वक्तव्य आलेले नाही. 

मोहम्मद सिराज, दीपक चहर, शार्दुल ठाकुर आणि कुलदीप सेन या 4 वेगवान गोलंदाज बांगलादेश दौऱ्यावर जाणार असतील तर शमीची रिप्लेसमेंट म्हणून पाचवा वेगवान गोलंदाज जाण्याची शक्यता कमी आहे. या ऐवजी एखादा फलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू दौऱ्यावर पाठविण्याचा विचार होण्याची शक्यता आहे. 

वन डे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (व्हाइस कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), शाहबाझ अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन

Ruturaj Gaikwad: या क्रिकेरटरमुळे ऋतुराजने 1 ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्स...खोलले गुपित

भारताविरुद्धच्या वन डे सीरिजआधी बांगलादेशला मोठा धक्का

भारताचा बांगलादेश दौरा

ढाक्यातील सर्व मॅच शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियमवर तर चटोग्राममधील सर्व मॅच जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होणार

  1. रविवार 4 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश पहिली वन डे, ढाका. थेट प्रक्षेपण सकाळी 11.30 पासून
  2. बुधवार 7 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश दुसरी वन डे, ढाका. थेट प्रक्षेपण सकाळी 11.30 पासून
  3. शनिवार 10 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश तिसरी वन डे, चटोग्राम. थेट प्रक्षेपण सकाळी 11.30 पासून
  4. बुधवार 14 डिसेंबर 2022 ते रविवार 18 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश पहिली टेस्ट, चटोग्राम. थेट प्रक्षेपण सकाळी 9 पासून
  5. गुरुवार 22 डिसेंबर 2022 ते सोमवार 26 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश दुसरी टेस्ट, ढाका. थेट प्रक्षेपण सकाळी 9 पासून

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी