न्यूझीलंडचे ६२ धावांत ओके टाटा बायSSS; भारताकडे ३३२ धावांची आघाडी

NZ allout in 62 runs भारताने दीड दिवसापेक्षा अधिक काळ खेळून सर्वबाद ३२५ धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पाहुण्या न्यूझीलंडचा डाव ६२ धावांत आटोपला. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रातच भारताचा दुसरा आणि कसोटी सामन्यातील तिसरा डाव सुरू झाला. 

NZ allout in 62 runs, India Lead By 332 Runs
न्यूझीलंडचे ६२ धावांत ओके टाटा बायSSS; भारताकडे ३३२ धावांची आघाडी 
थोडं पण कामाचं
  • न्यूझीलंडचे ६२ धावांत ओके टाटा बायSSS!
  • भारत सर्वबाद ३२५ धावा
  • दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रातच भारताचा दुसरा आणि कसोटी सामन्यातील तिसरा डाव सुरू

NZ allout in 62 runs मुंबईः फास्ट लोकलसारखी मुंबईची टेस्ट मॅच वेगाने सुरू आहे. भारताने दीड दिवसापेक्षा अधिक काळ खेळून सर्वबाद ३२५ धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पाहुण्या न्यूझीलंडचा डाव ६२ धावांत आटोपला. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रातच भारताचा दुसरा आणि कसोटी सामन्यातील तिसरा डाव सुरू झाला. 

न्यूझीलंडने २८.१ ओव्हरमध्ये सर्वबाद ६२ धावा केल्या. न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनाच दोन आकडी धावसंख्या उभारणे जमले. बाकीचे फलंदाज लवकर परतले. शेवटचे दोन फलंदाज शून्य धावांवर परतले. 

सलामीवीर टॉम लॅथमने १० धावा, विल यंगने ४ धावा, डेरिल मिचेलने ८ धावा, रॉस टेलरने १ धाव, हेन्री निकोलसने ७ धावा, टॉम ब्लंडेलने ८ धावा, राचिन रविंद्रने ४ धावा, केल जेमिसनने सर्वाधिक १७ धावा केल्या. एजाझ पटेल शून्य धावांवर नाबाद राहिला तर टीम साउदी आणि विलियम सोमरविले हे दोघे शून्य धावा करुन परतले. भारताकडून आर. अश्विनने ४, मोहम्मद सिराजने ३, अक्षर पटेलने २ आणि जयंत यादवने १ विकेट घेतली.

भारत बिनबाद ६९ धावा

दुसऱ्या डावात भारताने दिवस संपेपर्यंत बिनबाद ६९ धावा केल्या. मयांक अग्रवाल ३८ आणि चेतेश्वर पुजारा २९ धावांवर खेळत आहे. मुंबई कसोटीत दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे ३३२ धावांची आघाडी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी