IND vs NZ ...तर श्रेयस अय्यरला वगळले असते, BCCI TV साठी सुर्यकुमार यादवने घेतली श्रेयस अय्यरची मुलाखत

cricket india vs new zealand kanpur test shreyas iyer discloses on bcci tv how surykumar yadav backed him in tough times कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी बीसीसीआय टीव्हीसाठी सुर्यकुमार यादवने श्रेयस अय्यरची मजेदार मुलाखत घेतली.

cricket india vs new zealand kanpur test shreyas iyer discloses on bcci tv how surykumar yadav backed him in tough times
IND vs NZ ...तर श्रेयस अय्यरला वगळले असते 
थोडं पण कामाचं
  • IND vs NZ ...तर श्रेयस अय्यरला वगळले असते
  • बीसीसीआय टीव्हीसाठी सुर्यकुमार यादवने श्रेयस अय्यरची घेतली मुलाखत
  • सुर्यकुमारचा श्रेयसला भक्कम पाठिंबा

cricket india vs new zealand kanpur test shreyas iyer discloses on bcci tv how surykumar yadav backed him in tough times कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूर येथे सुरू आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या श्रेयस अय्यरने पदार्पणातच शतक केले. पदार्पणात शतक करणारा तो सोळावा भारतीय क्रिकेटपटू आहे. श्रेयसने १७१ चेंडूत १०५ धावा केल्यामुळे भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. 

कानपूर कसोटीआधीच भारताचा सलामीवीर केएल राहुल याला दुखापत झाली. यामुळे सुर्यकुमार यादव याचा संघात समावेश झाला. पण अंतिम अकरा खेळाडूंमध्ये सुर्यकुमारचा समावेश झाला नाही. श्रेयसला खेळण्याची संधी मिळाली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रेयसला जम बसण्यास सुरुवात झाली त्यावेळी कॅमेरा वारंवार सुर्यकुमारच्या दिशेने फिरवण्यात आला आणि प्रत्येकवेळी सुर्यकुमार श्रेयसला प्रोत्साहन देत असल्याचे दिसले. या निमित्ताने सुर्यकुमार आणि श्रेयस यांच्या मैत्रीची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली. 

कसोटी दरम्यान श्रेयससाठी ड्रिंक्स घेऊन जाताना आणि श्रेयसचे कौतुक करताना तसेच त्याला प्रोत्साहन देताना सुर्यकुमार दिसला. श्रेयसने शतक केल्याचे पाहून सुर्यकुमारने मनापासून भरपूर टाळ्या वाजवल्या. सुर्यकुमार आणि श्रेयस यांच्यातील मैत्रीने क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. 

कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी बीसीसीआय टीव्हीसाठी सुर्यकुमार यादवने श्रेयस अय्यरची मजेदार मुलाखत घेतली. या मुलाखतीत श्रेयसने सुर्यकुमार याच्याविषयी सांगितले. रणजी स्पर्धेत मुंबईकडून खेळायला सुरुवात केली असताना सुर्यकुमारने भक्कम पाठिंबा दिल्याचे श्रेयस म्हणाला.

बीसीसीआयने मुलाखतीचा व्हिडीओ ट्वीट करताना, 'त्याने श्रेयसची गळाभेट घेतली, टाळ्या वाजवल्या, तो सर्वाधिक आनंदात होता जेव्हा त्याच्या मित्राने पदार्पणात शतक झळकावले' असे नमूद केले. सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोघांना टॅग करुन बीसीसीआयने मुलाखतीचा व्हिडीओ ट्वीट केला.

मुलाखतीत श्रेयसने सुर्यकुमार सोबतची मैत्री आणि कानपूर कनेक्शन याविषयी माहिती दिली. कानपूरचे स्टेडियम माझ्यासाठी लकी आहे. मी पहिल्यांदा रणजी खेळलो त्यावेळी सुर्यकुमार संघाचा कर्णधार होता. पहिल्या चार डावांनंतर त्याने मला पाठिंबा दिला आणि यासाठी मी त्याचा कायम आभारी राहीन. मला वाटलेले की मला वगळले जाईल. पण त्याने मला साथ दिली; असे श्रेयस म्हणाला.

श्रेयसने मुलाखतीत एका जुन्या सामन्याची आठवण सांगितली. हा सामना कानपूर स्टेडियममध्ये झाला होता. मुंबईने जेमतेम २०-३० धावांमध्ये पाच गडी गमावले. नंतर श्रेयसने तळाच्या फलंदाजांच्या मदतीने १५० धावा केल्या आणि संघाला बऱ्या स्थितीत आणले. आयपीएलमध्येही कानपूर स्टेडियम लकी ठरल्याचे श्रेयस म्हणाला. कानपूरमध्ये खेळताना आयपीएलच्या एका सामन्यात श्रेयसने ९३ धावा केल्या होत्या. यामुळेच कानपूर स्टेडियम माझ्यासाठी अतिशय लकी आहे, असे श्रेयसने सांगितले.

भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी हे माझे स्वप्न होते. पण मी भारतासाठी आधी टी २० नंतर वन डे आणि आता टेस्ट क्रिकेट अर्थात कसोटी क्रिकेट खेळत आहे. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक केल्याचा मला प्रचंड आनंद होत आहे, असे श्रेयस म्हणाला. यापेक्षा आणखी चांगले काय असेल, असा प्रश्न करत त्याने हा माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस असल्याचे सांगितले.ही माझ्यासाठी खास जाणीव आहे, असेही तो म्हणाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी