R Ashwin indulge into argument with umpire आर. अश्विन आणि अंपायर नितिन मेनन यांच्यात वाद, कोच राहुल द्रविडने उचलले 'हे' पाऊल

Cricket India vs New Zealand R Ashwin indulge into argument with umpire Nitin Menon during Kanpur Test Rahul Dravid intervein भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कानपूर कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज आर. अश्विन आणि अंपायर नितिन मेनन यांच्यात वाद झाला.

Cricket India vs New Zealand R Ashwin indulge into argument with umpire Nitin Menon during Kanpur Test Rahul Dravid intervein
आर. अश्विन आणि अंपायर नितिन मेनन यांच्यात वाद, कोच राहुल द्रविडने उचलले 'हे' पाऊल 
थोडं पण कामाचं
  • अश्विन आणि अंपायर नितिन मेनन यांच्यात वाद, कोच राहुल द्रविडने उचलले 'हे' पाऊल
  • भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने हस्तक्षेप करूनही वाद मिटला नाही
  • अखेर द्रविडने पुढाकार घेतला

Cricket India vs New Zealand R Ashwin indulge into argument with umpire Nitin Menon during Kanpur Test Rahul Dravid intervein कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कानपूर कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज आर. अश्विन आणि अंपायर नितिन मेनन यांच्यात वाद झाला. गोलंदाजी करताना अश्विन मध्ये येत असल्यामुळे अंपायरिंग करणे कठीण होत आहे. व्यवस्थित दिसले नाही तर अचूक निर्णय देणे जमणार नाही, असे अंपायर नितिन मेनन यांचे म्हणणे होते. तर नियमानुसार गोलंदाजी सुरू आहे आणि मी अंपायरिंगच्या कामात कळत किंवा नकळतपणे अडथळा होत नसल्याचे अश्विन सांगत होता. दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे हळू हळू वाद वाढला. अखेर कोच राहुल द्रविड याला पुढाकार घ्यावा लागला. 

आर. अश्विन आणि अंपायर नितिन मेनन यांच्यात सुरू झालेला वाद वाढू लागला. वाद लवकर मिटविण्यासाठी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने हस्तक्षेप करून बघितला. पण वाद मिटला नाही. अखेर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पुढाकार घेतला. द्रविडने तातडीने जाऊन मॅचचे रेफ्री (सामनाधिकारी) जवागल श्रीनाथ यांची भेट घेतली. 

राहुल द्रविड आणि जवागल श्रीनाथ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर नितिन मेनन यांच्या पर्यंत एक संदेश पोहोचवला गेल्याचे वृत्त आहे. यानंतर वातावरण निवळले. वाद शमला. आर. अश्विन शांतपणे गोलंदाजी करू लागला आणि अंपायर नितिन मेनन यांनीही आक्षेप घेणे थांबवले. वाद शमल्यामुळे मैदानातील तणाव निवळला. 

राहुल द्रविडे याने वेळीच पुढाकार घेऊन सामनाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यामुळे वाद संपुष्टात आला. नाहीतर या वादामुळे तिसऱ्या दिवशी खेळादरम्यान भारतीय संघाला अडचणींचा सामना करावा लागला असता. पण द्रविडच्या पुढाकारामुळे संभाव्य संकट टळले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी