मयांक अग्रवालने शतक झळकावून केली या महान खेळाडूशी बरोबरी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 10, 2019 | 19:08 IST | टाइम्स नाऊ हिंदी

मयांक अग्रवालने पुण्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवागच्या ९ वर्षाच्या रेकॉर्डची बरोबरी करून दुसरे शतक झळकावले आहे.

cricket match about the mayank agrawal at pune cricket news in marathi
मयांक अग्रवालने शतक झळकावून,केली वीरेंद्र सेहवागची बरोबरी  |  फोटो सौजन्य: AP

पुणे : मयांक अग्रवालने पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक करून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध उत्तम कामगिरी करून दाखवली. रोहितनंतर मयांकने जबरदस्त फलंदाजी केली. पुण्यामध्ये सुरू झालेल्या क्रिकेटच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मयांकने पुन्हा एकदा शतक ठोकून एका विक्रमाची बरोबरी केली आहे. सलामीवीर मयांकने १८३ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. आपल्या शतकीय खेळीत त्याचबरोबर १६ चौकार आणि २ षटकार लगावले आहेत. 

विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने द्विशतक ठोकले होते. त्यावेळी मयांकने २१५ मोठ्या धावसंख्येला गवसणी घातली होती.  या सामन्यात शतक करून त्याने वीरेंद्र सेहवागच्या गेल्या ९ वर्षातील रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मयांक दक्षिण आफ्रिकेविरूद्ध लागोपाठ दोन कसोटी सामन्यात शतक झळकावणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. 

वीरेंद्र सेहवागची केली बरोबरी - 

 वीरेंद्र सेहवागने फेब्रुवारी २०१० मध्ये आफ्रिकेविरूद्ध नागपूर आणि कोलकाता येथे झालेल्या कसोटी सामान्यात १०९ आणि १६५ असा रेकॉर्ड करून भारताला मोठ्या धावसंख्येकडे पोहोचवण्याचे काम केले होते. त्यानंतर टीम इंडियामधील एकाही खेळाडूने त्याची बरोबरी केली नव्हती. मात्र तब्बल ९ वर्षानंतर भारताचा दुसरा फलंदाज मयांक अग्रवालने ही उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे, मयांकने सर्व खेळाडूंचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी