ICC Test ranking:  रोहित शर्माने गाठली करिअरची बेस्ट रँकिंग, मयांक अग्रवालला ३८ स्थानांचा फायदा 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 07, 2019 | 21:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC Test ranking: रोहित शर्मा आयसीसी टेस्ट रॅकिंगच्या करिअरचा सर्वात वरच्या स्थानावर पोहचला आहे. रोहितने नुकतेच दक्षिण आफ्रिके विरूद्ध पहिल्या टेस्टमध्ये दोन शतकीय खेळी खेळल्या. 

cricket news rohit sharma ravichandra ashwin icc cricket test ranking news in marathi google news
ICC Test ranking:  रोहित शर्माने गाठली करिअरची बेस्ट रँकिंग, मयांक अग्रवालला ३८ स्थानांचा फायदा   |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • रोहित शर्मा टेस्ट करिअरमध्ये सर्वश्रेष्ठ १७ स्थानावर पोहचला. 
  • रोहितने रँकिंगमध्ये ३६ स्थानाची घेतली झोप 
  • मयांक अग्रवालला ३८ स्थानांचा फायदा 

दुबई :  सलामीवीर फलंदाज म्हणून पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये उतरलेल्या रोहित शर्मा याने पहिल्या टेस्ट दोन्ही डावात शतक झळकावली. त्यामुळे सोमवारी आयसीसी टेस्ट क्रिकेट खेळाडूंच्या रँकिंगमध्ये करिअरमध्ये पहिल्यांदा १७ वे स्थान पटाकवले आहे. रोहितने आतापर्यंत २८ टेस्टमध्ये पाच शतक झळकावली आहे. त्याने विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिका विरूद्ध पहिल्या टेस्टमध्ये १७६ आणि १२७ धावांची खेळी करून ३६ स्थानांची झेप घेतली. या सामन्यात भारताने २०३ धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. 

दुसरा सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल याने पहिल्या डावात द्विशतक झळकावले त्यामुळे त्याला ३८ स्थांनाचा फायदा झाला. त्यामुळे त्यांनी २५ स्थानी झेप घेतली आहे. कर्णधार विराट कोहली आपले दुसरे स्थान कायम ठेऊन आहे. दरम्यान तो जानेवारी २०१८ नंतर तो पहिल्यांदा ९०० अंकावरून खाली आला आहे. आता त्याचे ८९९ अंक आहे. तर ऑस्ट्रेलिया स्टीव स्मिथ याच्यापेक्षा ३८ अंक मागे आहे. गोलंदाजांमध्ये ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने सामन्यात आठ विकेट पटाकावल्यानंतर पहिल्या १० गोलंदाजात स्थान मिळावले आहे. त्याने पहिल्या डावात १४५ धावा देऊन ७ विकेट पटकावल्या होत्या. 

पहिल्या स्थानावर राहिलेल्या अश्विनने १४ स्थानांची झेप घेतली आहे. तसेच तो ऑल राउंडर यादीतही पहिल्या पाचमध्ये पोहचला आहे. जलद गती गोलंदाज शमीने करिअरमधील ७१० अंक मिळविले आहेत. १८ व्या स्थानावरून १६ व्या स्थानावर पोहचला आहे. तो आपल्या करिअरच्या सर्वोच्च स्थान १४ व्या स्थानापासून दोन स्थान मागे आहे. तर रविंद्र जडेजा बांगलादेशच्या शाकिब अल हसनला मागे टाकून ऑल राउंडरमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. 

भारताला विशाखापट्टणम विजयानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीपमध्ये ४० अंकाचा फायदा मिळाला आहे. आता भारताचे १६० अंक झाले आहे.  वेस्ट इंडिजची मालिका २-० जिंकल्यानंतर १२० अंक मिळावले होते. न्यूझीलंडने आणि श्रीलंका १-१ ने ड्रॉ करून ६०-६० अंक आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पाच सामन्यांची मालिका २-२ डॉ करून ५६-५६ अंक आहे. 

दक्षिण आफ्रिकेसाठी शतकवीर क्विटन डी कॉक आणि डीन एल्गरला फायदा मिळाला आहे. डिकॉक चार स्थानाचा फायदा मिळविल्याने सातव्या स्थानावर पोहचला आहे. त्यामुळे पहिल्या १० मध्ये स्थान मिळावले आहे. एल्गरला पाच स्थानाचा फायदा झाला आहे. तो १४ व्या स्थानावर पोहचला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी