cricket stories : भोसले क्रिकेट अकादमीचा धावांचा डोंगर, ४५ धावांनी विजय 

cricket u-16 premier league । मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल अंडर १२ प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेची दिमागदार सुरूवात झाली आहे. 

cricket stories  Bhosle Cricket Academy won by 45 runs
cricket stories : भोसले क्रिकेट अकादमीचा धावांचा डोंगर 
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेतील साखळी सामन्यात भोसले क्रिकेट अकादमीने  एसएम स्पोर्ट्स संघाचा ४५ धावांनी विजय मिळविला आहे. 
  • अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १२ स्पर्धेचे आयोजन करतात.
  • भोसले क्रिकेट अकादमीकडून मनवीर जैन याने सर्वाधिक ५६ धावा केल्या.

cricket stories  । मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भोसले क्रिकेट अकादमीने  एसएम स्पोर्ट्स संघाचा ४५ धावांनी विजय मिळविला आहे. 

अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १२ स्पर्धेचे आयोजन करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नाही. यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने छोट्या स्पर्धा  सर्व मार्गदर्शक नियम पाळून घेण्याची परवानगी मिळाली.  

भोसले क्रिकेट अकादमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१ षटकात ३ बाद १६३ धावा केल्या.  भोसले क्रिकेट भोसले क्रिकेट अकादमीकडून मनवीर जैन याने सर्वाधिक ५६ धावा केल्या. यात त्याने ७ चौकार लगावले. आर्य कराळे याने ४० आणि एसएम स्पोर्ट्सकडून सर्वाधिक ३८ धावा शौनिक वाघधरे याने केल्या.  

भोसले क्रिकेट अकादमीच्या १६३ धावांचा पाठलाग करताना एसएम स्पोर्ट्स संघ ११८ धावांवर गारद झाला. भोसले अकादमीकडून  धैर्य म्हात्रे याने १६ धावा देत ३ विकेट घेतल्या. कार्तिक घरात याने २ षटकात ५ धावा देत २ विकेट घेतल्या. तर  मॅथन मिस्त्रीने ५ षटकात १५ धावात देत २ विकेट घेतल्या. 

दुसऱ्या एका सामन्यात सीएन स्पोर्टसने लिट्ल स्टार क्रिकेट संघाचा पाच गडी राखून पराभव केला.  १९.३ षटकात सर्व बाद ९६ धावा केल्या.  या छोट्या धावांचा पाठलाग करताना सीएन स्पोर्ट्सच्या संघाने २०.२ षटकांत  १०० धावा करून विजयश्री खेचून आणला. सीएन स्पोर्ट्स कडून सर्वाधिक ४१ धावा निखिल गुरवने केल्या. तर लिट्ल स्टार स्पोर्ट्स क्लबकडून सर्वाधिक ३१ धावा कार्तिक आचर याने केल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी