Video : स्टोक्सला भिडला कर्णधार कोहली, पंचांना करावा लागला हस्तक्षेप 

इंग्लंडला बॅकफूटवर ढकलताना अक्षर पटेलने दोन गडी बाद केले. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा बेन स्टोक्स यांच्यात संघर्ष झाला.

cricket virat kohli ben stokes arguments ind vs eng 4th test day 1 live cricket
Video : स्टोक्सला भिडला कर्णधार कोहली, पंचांना मिटवले भांडण  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जात आहे.
  • कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • डावाच्या 13 व्या षटकातील पहिल्या घातक चेंडूवर सिराजने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला माघारी पाठवले.

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जात आहे. ज्यामध्ये कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत गोलंदाजीसाठी आलेल्या भारताचा इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजनंतर अक्षर पटेलने दोन गडी बाद केले आणि इंग्लंडला बॅकफूटवर टाकले. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा बेन स्टोक्स यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. दोघे मैदानाचा एकमेंकांविरुद्ध भडले. 

डावाच्या 13 व्या षटकातील पहिल्या घातक चेंडूवर सिराजने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला माघारी पाठवले.  त्यावेळी कर्णधार कोहलीचा उत्साह सातव्या आसमानावर होता. रूटला 9 चेंडूत केवळ 5 धावा करता आल्या. अशाप्रकारे ओव्हर संपल्यानंतर ड्रिक्स घेण्यात आले.  यावेळी मैदानात कर्णधार कोहली आणि स्टोक्स यांच्यात संघर्ष झाला. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता, त्यानंतर पंचानी  प्रकरण शांत करण्यासाठी पुढाकार घेतले. 

डावाच्या 6 व्या षटकात कर्णधार कोहलीने हा चेंडू अक्षर पटेलच्या ताब्यात दिला. अशाप्रकारे, 6 व्या षटकात, सिब्ली आता येणारा चेंडू समजू शकला नाही.आणि चेंडू बॅटची आतील कड घेऊन चेंडू स्टंपवर जाऊ आदळला. अशा प्रकारे सिबली माघारी परतला. त्याला केवळ 2 धावा करता आल्या. त्यानंतर अक्षरने लवकरच जॅक क्रोलीला फॉलो माघारी धाडले. 

दुसरीकडे, टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडची अवस्था बातमी लिहिण्यापर्यंत ठीक नव्हती. त्याच्या ४ विकेट फक्त १२० धावांच्या आत बाद झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी